spot_img
अहमदनगरनगरमध्ये चाललंय काय? डिलिव्हरी बॉयवर सपासप वार, वडारवाडीत राडा, मुकुंदनगरमध्ये प्राणघातक हल्ला,...

नगरमध्ये चाललंय काय? डिलिव्हरी बॉयवर सपासप वार, वडारवाडीत राडा, मुकुंदनगरमध्ये प्राणघातक हल्ला, वाचा क्राईम..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील केडगाव परिसरात घरासमोर पार्क केलेली टाटा हॅरियर गाडी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केली. अंदाजे ११ ते १२ लाख रुपये किमतीची ही गाडी चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी सौरभ राजेंद्र शेळके (रा. केडगाव, ता. जि.अहिल्यानगर ) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २५ सप्टेंबर रोजी दुपारी त्यांनी आपली काळ्या रंगाची टाटा हॅरियर (एमएच १६ सीवाय ९६९६) ही गाडी घरासमोर पार्क केली होती. रात्री ११ वाजेपर्यंत ती जागेवर होती. मात्र दुसऱ्या दिवशी २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता कामावर जाण्यासाठी बाहेर पडताना गाडी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. गाडीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र कुठेही काही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलिस करत आहे.

केडगावातील मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा
शहरातील अवैध मटका व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई करत केडगावमधील श्रीराम चौकाजवळील पान टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी एकाला रंगेहाथ अटक करण्यात आली असून, ८ हजार २० रुपये रोख रक्कम आणि मटका साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र मटका अड्ड्याचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. सदरची कारवाई २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या आदेशावरून पोलिस हेड कॉन्स्टेबल रविकिरण सोनटक्के यांच्या पथकाने केली. त्रिशक्ती पान टपरीच्या मागील बाजूस मटका जुगार सुरू असल्याचे समजताच पोलिसांनी पंचांसह त्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जण पळून गेले, मात्र राकेश कन्हैय्यालाल फुलडहाळे (वय ४९, रा. गंज बाजार, अहिल्यानगर) याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून ८ हजार २० रुपये रोख, तसेच मटका खेळात वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. चौकशीत त्याने हा मटका व्यवसाय महेश कचरे (रा. सावेडी) याच्या सांगण्यावरून चालवित असल्याची कबुली दिली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या फरार असलेल्या महेश कचरेचा पोलीस शोध घेत आहेत.

दांडियाच्या वादातून डिलिव्हरी बॉयवर
दांडिया कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादातून २१ वर्षीय डिलिव्हरी बॉयवर धारदार शस्त्रांनी सपासप वार करून जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही धक्कादायक घटना बोल्हेगाव येथील दत्त मंदिराजवळ घडली असून, या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. जखमी युवकाची प्रकृती गंभीर असून तो खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. जखमी तरुणाचे नाव ओंकार अनिल शिंदे (वय २१, रा. भिंगार) असे आहे. गुरुवारी रात्री तो आपल्या मित्रांसह संजोग लॉन येथे दांडिया खेळण्यासाठी गेला होता. यावेळीओळखीचा असलेल्या ओंकार वाघ याने त्याला जास्त हवेत उडू नको अशी धमकी दिली होती. दांडिया संपल्यानंतर रात्री सव्वा अकराच्या सुमारास, ओंकार शिंदे आपल्या मैत्रिणींना सोडण्यासाठी बोल्हेगाव येथील दत्त मंदिराजवळून जात असताना ओंकार वाघ व त्याच्या दोन साथीदारांनी त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर कोणी मध्ये आला, तर मारून टाकीन अशी धमकी देत ओंकार वाघने त्याच्या पोटावर चाकूने वार केला, तर इतर दोन साथीदारांनी मांडीवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. एका अनोळखी व्यक्तीच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी ओंकार वाघ आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

मुकुंदनगरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला
मुकुंदनगर परिसरात एका २७ वर्षीय तरुणावर चॉपर, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ‘आज याला पेट्रोल टाकून जाळून टाकू, अशी उघड धमकी देत आरोपींनी तरुणाच्या डोक्यात गंभीर वार केले. ही थरारक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी रेहान रौफ शेख (वय २७, रा. झेंडीगेट, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दानीष, साहिल उर्फ बाऊ, उपेंरलाला, नाजिश ननु, अफनान उर्फ अफु, तालीम आणि इतर तीन ते चार अनोळखी इसमांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहान शेख गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुकुंदनगर येथील मशिदीजवळ थांबले असताना वरील आरोपींनी त्यांना गाठून जुन्या वादातून शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. चॉपर, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी डोक्यात आणि शरीरावर सपासप वार केले. हल्ल्यात एका आरोपीने ‘आज याला पेट्रोल टाकून जाळून टाकू’ अशी धमकीही दिली. हल्ल्यानंतर आरोपी पळून गेले असून, जखमी रेहान शेख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करत आहेत.

वडारवाडीत दोन कुटुंबांत राडा
शहरातील वडारवाडी येथील शिवशक्ती कॉलनीत दोन कुटुंबांत राडा झाल्याची घटना घडली. क्षुल्लक कारणावरूनएका महिलेला फायबर पाईपने बेदम मारहाण करण्यात आली. तुम्ही इथे राहिलात तर जिवंत सोडणार नाही, मला फाशी झाली तरी चालेल,”अशी उघड धमकीही यावेळी देण्यात आली. याप्रकरणी चार जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत जखमी महिलेने फिर्याद दिली आहे. २१ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास वादाला सुरुवात झाली. यावेळी आरोपींनी फायबरच्या पाईपने डोक्यात, हातावर आणि पायावर मारहाण करत शिवीगाळ केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पतीला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुम्ही येथे राहू नका. राहिलात, तर तुम्हाला जिवे ठार मारू. मला फाशीची शिक्षा झाली तरी चालेल, अशी थेट धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी मिना गर्जे, बाबासाहेब गर्जे, आदित्य गर्जे आणि आदिती गर्जे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बी. बी. अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शनि शिंगणापूर मंदिर कार्यालयास ठोकले सील; कलेक्टरांकडून ‘देऊळ कार्यालय बंद’

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शनी शिंगणापूर देवस्थानचे कार्यालय जिल्हा प्रशासनाकडून सील करण्यात आले...

नगरकरांनो सतर्क राहा! जिल्ह्यासाठी यलो अलर्ट, हवामान खात्याची महत्वाची अपडेट..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 27 ते 29 सप्टेंबर 2025...

मर्चंट्‌‍स बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत; सभासदांनासाठी खुशखबर, बँक काय देणार भेट?, वाचा सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण करणाऱ्या अहमदनगर मर्चंट्‌‍स बँकेला रिझर्व्ह बँकेने शेड्युल्ड बँकेचा...

बैलगाडा शर्यत प्रेमींना दिलासादायक बातमी; आयोजनातले अडथळे दूर होणार, सुजित झावरे पाटील यांचा पुढाकार

प्रांताधिकाऱ्यांना परवानगीचे अधिकार देण्याची मागणी यशस्वी; शेतकऱ्यांना दिलासा पारनेर | नगर सह्याद्री शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या...