spot_img
अहमदनगरनगरमध्ये चाललंय काय? मुलावर अनैसर्गिक अत्याचार!, १२ जणांच्या टोळीचे भयंकर कृत्य..

नगरमध्ये चाललंय काय? मुलावर अनैसर्गिक अत्याचार!, १२ जणांच्या टोळीचे भयंकर कृत्य..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
एका अल्पवयीन मुलाचे वाहनातून अपहरण करून त्याच्यावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच त्याला मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना केडगाव उपनगरात १४ एप्रिलच्या रात्री घडली. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाने (वय १६) गुरूवारी (१७ एप्रिल) सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून १२ जणांविरूध्द खुनाचा प्रयत्न, अपहरण, अनैसर्गिक अत्याचार, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगा अहिल्यानगर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून त्याने गुरूवारी सायंकाळी आपल्या आईसह कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. रावण साम्राज्य ग्रुप केडगावचे अध्यक्ष मयुर अनिल आगे, अबुजर राजे (पूर्ण नाव माहिती नाही), शाहरूख अन्सार पठाण, आदित्य प्रशांत सोनवणे, अजय किशोर शिंदे, ओमकार उर्फ भैया राहिंज, रोहित पांडागळे, सोनू बारहाते, ऋषिकेश सातपुते, रोहित कोल्हे, अतिफ शेख, सौरभ गायकवाड (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.

१४ एप्रिल रोजी रात्री केडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक संपल्यानंतर फिर्यादी मुलगा केडगाव येथील मित्राच्या घरी झोपण्यासाठी गेला. तेथे झोपलेला असता रात्री ११:३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपींनी दरवाजा तोडून घरात घुसून त्यास व त्याच्या मित्राच्या वडिलांना मारहाण केली. त्यानंतर त्यास जबरदस्तीने रस्त्यावर ओढून ओढून नेण्यात आले.

संशयित आरोपींनी त्याला स्कॉर्पिओ वाहनमध्ये जबरदस्तीने बसवून, त्याचे कपडे काढायला लावले, व्हिडीओ शुटिंग करून त्याचा लैंगिक छळ केला व काही संशयित आरोपींनी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्याला निर्जनस्थळी नेत त्याचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, सदरचा प्रकार पीडित मुलाने कोणालाही सांगितला नाही. मात्र मारहाणीमुळे त्याचा डोळा सुजला व त्याला आईकडून विचारणा झाली. त्यानंतर त्याने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...

ग्रामपंचायत अधिकारी पठाण यांच्यावर हल्ला! ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा काम बंदचा इशारा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती शकीला पठाण...