spot_img
ब्रेकिंगअहिल्यानगरमध्ये चाललंय काय? सरपंच पतीवर हल्ला! दहा जणांच्या टोळक्याच्या कृर्त्याने गाव हादरलं..

अहिल्यानगरमध्ये चाललंय काय? सरपंच पतीवर हल्ला! दहा जणांच्या टोळक्याच्या कृर्त्याने गाव हादरलं..

spot_img

जामखेड । नगरत सहयाद्री:-
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मागील भांडणाच्या कारणावरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व खर्डा येथील सरपंच पती वैजीनाथ पाटील यांच्यावर दहा जणांनी लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी तीन महिलांसह एकूण दहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैजीनाथ पाटील हे खर्डाच्या सरपंच संजीवनी पाटील यांचे पती आहेत. फीर्यादी वैजनाथ पाटील दि. 4 एप्रिलला रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या मित्रांसोबत खर्डा शहरातील एका खानावळीमध्ये गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी श्रीकांत लोखंडे हा हॉटेल समोरुन एक दोन वेळा गेला होता. यानंतर रात्री अकरा वाजता फीर्यादी वैजनाथ पाटील हे हॉटेलमध्ये असताना वरील आरोपी हातात लोखंडी पाईप व लाकडी दांडके घेऊन आले व ‘हे पाटील माजलेत, याला जीवे मारा’ अशी धमकी देत हातातील लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात सुरुवात केली. या घटनेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील हे गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना जामखेड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पाटील यांनी दि 5 एप्रिलला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गहिनीनाथ मुकुंद खरात, श्रीकांत भिमराव लोखंडे, बारक्या नवनाथ खरात, मुकुंद खरात (पूर्ण नाव माहीत नाही), संभाजी केरु खरात, ओंकार परमेश्वर इंगळे, संजीवनी संभाजी खरात, पुजा गहिनीनाथ खरात, सविता बाळासाहेब खरात व एक अनोळखी इसम (सर्व रा. शुक्रवार पेठ, खर्डा ता. जामखेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिंदू संकृतीला डळमळीत करणार्‍या वोकिझम संकटाला समजून घ्या; शिवशंभू व्याख्याते नीलेश भिसे

उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम अहिल्यानगर | नगर सह्याद्री आता...

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणीपुरीवाल्याला मारहाण, नगरमध्ये ‘येथे’ घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील दिल्लीगेट परिसरात पाणीपुरी विक्रेत्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग...

चास घाटात दरोडा!; ‘ती’ टोळी पकडली

चास घाटाजवळील घटना; सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे...

धक्कादायक! नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...