spot_img
ब्रेकिंग" काय होतास तू काय झालास तू…” ; आमदार धस यांची मंत्री...

” काय होतास तू काय झालास तू…” ; आमदार धस यांची मंत्री मुंडेंवर टीका

spot_img

बीड । नगर सहयाद्री:-
बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले. मात्र हे आरोप मुंडेंनी फेटाळून लावले तरी आता पुन्हा एकदा भाजप आमदार सुरेश धस यांनी काय होतास तू काय झालास तू म्हणत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले सुरेश धस?
“हा रोष एकट्या बीड जिल्ह्यात नाही, तर राज्यभरात लोकांच्या मनात आहे. कोणाला ही घटना पटलेली नाही. मला वाटतं काल सर्वपक्षीय बैठक सुद्धा बीडला झाली आहे. काही निर्णय झालेत. बीड जिल्हा एकवटेल असं चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी हे सगळं मनावर घेतलंय”, असंही पुढे बोलताना आमदार धस म्हणाले.

यावेबीड जिल्ह्यात गँग ऑफ वासेपूर
बीडमधील कायदा-सुव्यवस्थाबाबतही भाष्य केलं. “बीड जिल्ह्यात कायदा राहिला नाही. कायदा-सुव्यस्था आहे की नाही हा प्रश्न पडला आहे. बीड जिल्ह्यात गँग ऑफ वासेपूर सुरू आहे” असा मोठा आरोप सुरेश धस यांनी केला. “मी पोलीस ठाण्यात सर्वात कमी फोन करणारा नेता आहे. पोलीस, सीआयडी आरोपींच्या पाठीमागे आहेत. आरोपीला लवकरच अटक होईल अशी अपेक्षा आहे. आरोपी विष्णू चाटे हा आकाच्या खालचा छोटे आका आहे. पोलिसांनी पकडलं असं वाटत नाही, ते स्वत: सरेंडर झाले आहेत. यातला आका लवकरात लवकर आत गेला पाहिजे.”, अशी मागणी देखील आमदार धस यांनी केली.

“मुख्यमंत्र्यांनी बीडचं पालकमंत्री व्हावं”
यावेळी बीडच्या पालकमंत्रीपदाबाबतही धस यांनी भाष्य केलं. “बीडचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारावा. अजित पवार जरी झाले तरी माझी हरकत नाही” असं सुरेश धस म्हणाले. तसंच, हे दोघे पालकमंत्री होतील असे मला वाटत नाही असंही पुढे धस म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेर शहरातील कार्यकर्त्‍यांना मंत्री विखे पाटलांचा महत्वाचा संदेश; तयारी सुरु करा! आता शहरात विकासाची गंगा..

संगमनेर । नगर सहयाद्री: आ.अमोल खताळ यांच्‍या विजयाने तालुक्‍यात परिवर्तन होवू शकते हा विश्वास...

पालकमंत्रिपदावरून ताणाताणी; महायुतीत कोण-कोण नाराज?

मुंबई | नगर सह्याद्री:- महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून सरकारमधील तिन्ही पक्षात कमालीची अस्वस्थता दिसून येत...

संतोष देशमुख हत्त्या प्रकरणी खा. बजरंग सोनवणे संतापले; ५ मोठ्या मागण्या कोणत्या?

बीड | नगर सह्याद्री बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात...

सावकारी टोळक्यांची दादागिरी; बंद पाडले व्यावसायिकचे दुकान, अहिल्यानगर शहरातील धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या टोळक्यांनी व्याजापोटी दहशतीने दुकान बंद करुन, सातत्याने...