spot_img
देशआंघोळ, शौचायलाची व्यवस्था काय होती? पोट भरण्यासाठी काय केलं? बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा...

आंघोळ, शौचायलाची व्यवस्था काय होती? पोट भरण्यासाठी काय केलं? बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा असा होता थरार

spot_img

नगर सह्याद्री टीम : उत्तराखंडमधल्या सिलक्यारा बोगद्यात ४१ कामगार अडकले होते. तब्बल १७ दिवसांनंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. त्यांना वाचवणारी टीम अहोरात्र प्रयत्न करत होती.

अखेर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यास सर्वाना उपचारासाठी दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सर्व कामगारांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलय. पण या सतरा दिवसात कामगारांनी बोगद्यात काय केलं, त्यांचा दिनक्रम कसा होता? आंघोळ, शौचालयाची व्यवस्था कशी केली होती? आदी प्रश्न अनेकांना पडले आहेत. चला जाणून घेऊयात..

‘असा’ असायचा दिनक्रम
12 नोव्हेंबरला कामगार बोगद्यात काम करत असताना मोठा आवाज झाला आणि ढिगारा कोसळला. कामगारांनी पळण्याचा प्रयत्न केला पण ढिगाऱ्यामुळे सर्व रस्तेच बंद झाल्याने ते अडकले. सुरुवातीला आपण फार काळ जीवंत राहाणार नाही अशी मनात भीती त्यांच्या मनात आली, परंतु त्यांनी एकमेकांना धीर देत, 24 तास एकमेकांचे हात पकडून वेळ ढकलली. तोपर्यंत बाहेर कामगार अडकल्याची माहिती पसरली आणि कामगारांच्या बचावकार्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले.

13 नोव्हेंबरला कामगारांना इलाचीयुक्त तांदूळ पुरवण्यात आले. जेव्हा पहिल्यांदा तांदूळ मिळाले तेव्हा विश्वास वाढला की आमचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. पण वेळ घालवणं कठिण जाऊ लागलं. त्यातील एक जण सांगतो की, मोबाईल फोन होते, त्यावर ल्यूडो खेळू लागलो.

पण मोबाईलचं नेटवर्क नसल्याने बाहेर कोणाशी संपर्क होऊ शकत नव्हता. शौचालयासाठी बोगद्याच्या कोपऱ्यात खड्डा करण्यात आला होता असंही तो म्हणाला. मनोरंजनासाठी पत्ते आणि मोबाईल फोनवर ल्यूडो खेळायचो असं ओराव यांनी सांगितलं. सुदैवाने बोगद्यात पाण्याचा एक नैसर्गिक स्त्रोत होता.

त्यावरच पिण्याच्या आणि आंघोळीची व्यवस्था करण्यात आली होती. एका पाईपच्या माध्यमातून त्यांना जेवण पुरवण्यात आलं असा त्यांचे १७ दिवस दिनचर्या होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...