spot_img
अहमदनगर'संग्राम जगताप यांच्या विजयासाठी मातृशक्तीने कसला पदर'

‘संग्राम जगताप यांच्या विजयासाठी मातृशक्तीने कसला पदर’

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
येत्या २० नोव्हेंबरला सर्वांनी सकाळी लवकर उठून भारतमातेची पूजा समजून आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावावे. महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप हे अनुभव संपन्न आहेत. विकासाचे व्हिजन असलेले व ते पूर्ण करण्याची क्षमता असलेले आ.जगताप यांना आपल्याला पुन्हा निवडून आणायचे आहे. केलेल्या कामांचे प्रगती पुस्तक जनते पुढे ठेवून पुढचे व्हिजन मांडणारे आ.संग्राम जगताप हे शहरातील एकमेव आमदार आहेत, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य गीता गिल्डा यांनी केले.

महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या विजयासाठी शहरातील मातृशक्तीने पदर कसला आहे. विविध क्षेत्रातील महिला एकत्र येत आ.जगताप यांचा घरोघरी प्रचार करत आहेत. यामध्ये प्रयास ग्रुप, संकल्प ग्रुप, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, आरपीआय, दादा नाणी ग्रुप आदी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला एकत्र येत शहरातील विविध भागांमध्ये प्रचार करत आहेत.

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य गीता गिल्डा, आरपीआयच्या जया गायकवाड, प्रयास ग्रुपच्या अलका मुंदडा, रजनी भंडारी, नीलिमा पवार, हेमा कटारिया, आशा गायकवाड, लीला अग्रवाल, छाया रजपूत, कालिंदी केसकर, नीता देवराईकर, चारुशीला सुभेदार व प्रिया गायकवाड आदी महिला उपस्थित होत्या.

अलका मुंदडा म्हणाल्या, नगर शहराच्या विकसित उज्वल भवितव्यासाठी पुन्हा संग्राम जगतापच आमदार होणे आवश्यक आहे. सर्वांच्या मदतीसाठी धावून जात ते कायम उपलब्ध असतात. त्यामुळे माझी महिला मतदार भगिनींना विनंती आहे की जास्तीत जास्त महिलांनी २० नोव्हेंबरला बाहेर पडून आ.संग्राम जगताप यांनाच सर्वांनी मतदान करावे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...