मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यात मुली-महिलांवरील अत्याचाराच्य घटना दिवसेंदिवस वाढतच असून कधी बाहेरचे तर कधी घरातलेच हे हैवानी कृत्य करताना समोर येत आहेत. अशातच मुंबईत आता पुन्हा अशीच एक भयानक घटना घडली आहे. मुंबई मधील पवई येथे १३ वर्षांच्या नातींवर आजोबांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपी आजोबाला अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलगी अवघी 13 वर्षांची असून ती आई-वडिलांसह पवई येथे राहते. तिच्या चुलत आजोबांनीच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. गेल्या महिन्याभरापासून हा घृणास्पद प्रकार सुरू होता. पीडित मुलीचे आई-वडील हे कामावर गेल्यावर तो नराधम इसम संधी साधायचा आणि त्या मुलीवर अत्याचार करायचा. तसेच या घटनेबाबत कोणालाही सांगितलं तर जीवानिशी मारेन अशी धमकीही त्याने पीडित मुलीला दिली होती. त्यामुळे ती निमुटपणे हा अत्याचार सहन करत होती.
मात्र काही दिवसांनी त्रास होऊ लागल्याने तिने कशीबशी हिंमत गोळा करत घडलेल्या प्रकाराबाबत तिच्या आईला सांगितलं. नराधम नातेवाईकाचं हे कृत्य आणि मुलीला काय काय सोसाव लागलं हे ऐकून त्या मालीच्या पायाखालची जमीनच सरकली. घरच्यांना सर्व प्रकार सांगितल्यावर तेही हादरले. मात्र घडलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे या हेतूने त्यांनी पोलिसांत धाव घेतील. पवई पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर त्या नराधमाविरोधात बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.