पारनेर | नगर सह्याद्री:-
ज्या जनतेने निवडून दिले, त्यांना वाऱ्यावर सोडले! ज्या कामाशी तुमचा संबंध नाही त्या कामाचे श्रेय घेता! ती तर त्यांची जुनीच सवय आहे. पुणे ते शिरुर रस्ता, उड्डाणपूल हे काम केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी माग लावले. तो त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि त्या कामाची घोषणा त्यांनी दोन वर्षापूवच केली आहे. शिरुर ते पुणे या रस्त्याशी नगरच्या खासदाराचा काडीमात्र संबंध नाही. ज्यावेळी या कामाची घोषणा गडकरींनी केली त्यावेळी नगरचे खासदार सुजय विखे पाटील होते. दोन दिवसांपूव यांनी हे काम आपण मंजूर केल्याचे बातम्यांमधून सांगितले. तुमचा या कामाशी संबंध काय असा थेट हल्लाबोल पारनेर भाजपाचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांनी उपस्थित केला.
देवीभोयरे ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात राहुल पाटील बोलत होते. यावेळी देवीभोयरे व परिसरातील ग्रामस्थांनी आ. काशिनाथ दाते यांचा नागरी सत्कार केला. यावेळी बोलताना राहुल पाटील शिंदे पुढे म्हणाले की, ज्याच्यावर अन्याय होतो त्याला आम्ही न्याय देऊ शकतेो, अशी भावना पोलिसांसह तहसील कर्मचाऱ्यांची झालीय. दाते सर यांच्या आमदार होण्याने तालुकाच नव्हे तर जिल्हा शांत झाला आहे. ही शांतता कायमच राहणार आहे.
कोणी फारच वळवळ करणार असेल तर त्याचा बंदोबस्त दाते सर नक्कीच करतील. शिरुर ते पुणे उड्डानपुल अन् रस्ता कामाच्या बातम्या देणाऱ्यांचा या कामाशी संबंध काय ते त्यांनी आधी जाहीर करावे. तुम्ही खासदार कोणत्या जिल्ह्याचे, तुम्ही बातमीतून श्रेय कोणत्या जिल्ह्याचे आणि कामाचे घेता असा प्रश्न उपस्थित करतानाच जनतेने आपल्याला निवडून कशाकरता दिले हेच यांना समजेना झाले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. प्रश्न कोणते साडायचे याचा अभ्यास आधी करा.
तुमच्या गावातील अतिक्रमण आधी हटवून दाखवा असे जाहीर आव्हानच राहुल पाटील यांनी खा. लंके यांना त्यांचा नामोल्लेख टाळत दिले. तुमच्या खाली खूप अंधार पडलेला आहे. तो अंधार तुम्हाला दिसत नाही. तुमच्या डोक्यावरचं भूत कालच्या विधानसभेला जनतेने उतरवले आहेच. आता पुढच्या पाच वर्षानंतर देखील हीच पुनरावृत्ती होणार आणि त्यानंतर तुमचा पंचवीस वर्षापूवचा काळ तुम्हाला जनता द))ाखविल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास देखील राहुल पाटील यांनी व्यक्त केला.
तर त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल; आमदार काशीनाथ दाते
सुसंस्कृत राजकारण आणि समाजकारण केल्यानेच जनतेला मला आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिलीय. निवडणूक संपली असली तरी काहींच्या डोक्यातील खटका कायम दिसत आहे. मी संयमी नक्कीच आहे. मात्र, आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा, डिवचण्याचा प्रयत्न कराल तर मलाही जशास तसे उत्तर द्यावे लागले आणि त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल असा गर्भित इशारा आमदार काशिनाथ दाते यांनी विरोधकांचा नामोल्लेख टाळत यावेळी बोलताना दिला.