spot_img
ब्रेकिंगसाडेतीन मुहुर्तांपैकी एक असणार्‍या 'अक्षय्य तृतीये' चे महत्व काय? जाणून घ्या सविस्तर..

साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणार्‍या ‘अक्षय्य तृतीये’ चे महत्व काय? जाणून घ्या सविस्तर..

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम
हिंदू दिनदर्शिकेच्या मुख्य तिर्थीपैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्ता अक्षय्य तृतीयेला देखील असतो. अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही. अक्षय्य तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. दुसर्‍या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी भगीरथाने गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आणली होती. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात, अशी श्रद्धा आहे.

अक्षय्य तृतीया हा दिवस माता अन्नपूर्णा, स्वयंपाकघर आणि पाककलेची देवी, यांचा वाढदिवस देखील मानला जातो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते. दक्षिणेकडील प्रांतात अक्षय्य तृतीयेला लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे, म्हणूनच लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णूची पूजा केली जाते.

महर्षी वेद व्यास यांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षयपात्र’ प्राप्त झाले होते. या अक्षयपात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही. या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. अक्षय्य तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे. या दिवशी दुशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कृष्णाला त्याचा गरीब मित्र सुदामा  भेटायला आला. कृष्णाने या दिवशी सुदाम्याचे दारिद्य्र दूर केले, तेव्हापासून अक्षय्य तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले आहे.उन्हाळ्यात येणारे आंबे आणि चिंच अक्षय्य तृतीयेला अर्पण केले जातात. कच्चा आंबा, चिंच आणि गूळ पाण्यात मिसळून देवतेला अर्पण केले जाते. हा दिवस सर्व शुभ कार्यासाठी उत्तम आहे. कोणत्याही शुभ कार्याला अक्षय्य तृतीयेला मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी : तनपुरे, वर्पे यांच्या पाठोपाठ लंके यांचा ईव्हिएम पडताळणीसाठी अर्ज, केली ‘ही’ मागणी

१८ बुथवरील मतांची पडताळणी करण्याची मागणी ८ लाख ४९ हजार ६०० रूपये शुल्क जमा पारनेर /...

बच्चू कडू यांच्याबद्दल विखे पाटीलांचे मोठे विधान

राहाता / नगर सह्याद्री - Radhakrishn Vikhe Patil | Bachchu Kadu : महाराष्ट्रात महायुतीच्या...

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? दिग्गज नेत्यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा झटका बसला....

आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जाऊ नका!; पक्ष सोडण्याची भाषा करणाऱ्यांना राठोड यांचा टोला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिक हे एकनिष्ठ आहेत. कोणीही तुटणार...