spot_img
अहमदनगरआकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनची भानगड काय? 'या' परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनची भानगड काय? ‘या’ परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

spot_img

निघोज। नगर सहयाद्री 
निघोज, शिरापूर, देवीभोयरे तसेच टाकळी हाजी ता. शिरुर परिसरात रात्री दहा ते एक वाजेपर्यंत ड्रोन कॅमेरे उडताना दिसत आहे, मात्र या डोन्सची भानगड काय आहे, यातून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जिल्हाधिकारी व संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन जनतेला या बाबत प्रबोधन करुन भिती दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

रात्री दहा नंतर चार ते पाच ड्रोन कॅमेरे उडताना पाहिले असल्याची माहिती शिरापूर येथील अंकुश वडने यांनी दिली. तसेच टाकळी हाजी येथील महिला बचत गटाच्या अध्यक्षा मनिषाताई बारहाते यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की बुधवार दि. २६ रोजी रात्री दहा वाजता ड्रोन सदृष उपकरणे आकाशात घिरट्या घालताना दिसले असून हे उपकरणे निघोज तसेच शेजारील गावातून येत असून यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगितले.

याबाबत लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून शासकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ काळजी घेऊन जनतेच्या मनातील भिती नाहीशी होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जनतेतून करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...