spot_img
ब्रेकिंगजून महिन्याच्या 'या' तारखेला मान्सूनची वर्दी! भारतीय हवामान खात्याची नवी अपडेट काय?...

जून महिन्याच्या ‘या’ तारखेला मान्सूनची वर्दी! भारतीय हवामान खात्याची नवी अपडेट काय? पहा..

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
नैऋत्य मान्सून केरळमध्ये ३१ मे पर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्यावतीने मुंबईत मान्सून १० ते ११ जूनपर्यंत पोहोचू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी ज्या प्रमाणं मान्सून मुंबईत पोहोचतो त्यानुसार यंदा देखील त्याच दरम्यान यावेळी आगमन होऊ शकते.

भारतीय हवामान विभागाच्या वतीने शास्त्रज्ञांकडून केरळमधील मान्सूनच्या आगमनानंतरच्या घडामोडींचा अभ्यास केला जाईल. तोपर्यंत अधिकृतरित्या मान्सूनच्या मुंबईतील आगमनाची निश्चित तारीख सांगण्यात आलेली नाही. १० जून पर्यंत मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून १९ मे २०२४ पर्यंत मालदीव, कोमोरिन, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्र येथे मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती दिलेली होती.

हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अंदाजानुसार जर मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असला तरी मुंबईत मान्सूनचे आगमन होण्यासाठी १० -११ जूनची वाट पाहावावी लागेल, असे म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना मान्सून अंदमानमध्ये दाखल झालेला आहे.

केरळमध्ये ३१ मे पर्यंत मान्सून पोहोचेल. त्यानंतर मुंबईत पोहोचण्यासाठी १० ते ११ जूनपर्यंत वाट पाहावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. केरळमध्ये मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतर हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुंबईतील आगमनाची निश्चित तारीख जाहीर करु, असे देखील हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...