spot_img
लाईफस्टाईलसोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

spot_img

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी करत आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की, आयुष्य जगताना अनेक टप्प्यांवर आर्थिक समीकरणेही बदलतात. या आणि अशा अनेक बदलांमुळे आर्थिक गणिते बदलतात. हे बदल योग्य प्रकारे हाताळले गेले, तर त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होतो. यासाठी आधीपासूनच काही बाबतीत सावध असावे. उदा. जे सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल त्यावर हॉलमार्किंग आहे की नाही हे तपासून घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बिलासंदर्भातील. बिलाशिवाय सोने खरेदी करू नका. जीएसटी कर वाचवण्यासाठी बिल टाळले जाते. योग्य आणि खरे बिल घेऊनच सोने खरेदी करा. मात्र जर त्या दागिन्यांमध्ये काही खोट किंवा अडचण निर्माण झाली तर बिलाशिवाय सराफ ते दागिने स्वीकारणार नाही. ते दागिने विकताना तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल.

काय आहे बीआयएसच्या सूचना
ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्सच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सराफाकडून मिळालेल्या बिल किंवा चलानमध्ये हॉलमार्क असणाऱ्या वस्तूंची माहिती व्यवस्थित दिलेली असली पाहिजे. हॉलमार्क असणाऱ्या दागिन्यांच्या बिलात प्रत्येक वस्तूचे विवरण, किंमतीची माहिती, शुद्धता, धातूचे शुद्ध वजन, कॅरेट आणि हॉलमार्किंग चार्ज यांचा उल्लेख असला पाहिजे. हॉलमार्क असणाऱ्या वस्तूंच्या बिलात असेही लिहिलेले असले पाहिजे की ग्राहक हॉलमार्क असणाऱ्या दागिने किंवा वस्तूंच्या शुद्धतेला बीआयएसद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही केंद्रात तपासू शकतात.

कसे असावे बिल
समजा तुम्ही सराफाकडून सोन्याचे दागिने खरेदी केले. तुम्ही १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याची चैन खरेदी केली. अशावेळी तुमच्या बिलात पुढीलप्रमाणे माहिती असायला हवी.

उदा-
वस्तूचे नाव – सोन्याची चैन
संख्या- १
वजन- १० ग्रॅम
शुद्धता- २२ कॅरेट
सध्याचा सोन्याचा भाव आणि मेकिंग चार्ज
हॉलमार्किंगचे शुल्क- ३५ रुपये + जीएसटी
ग्राहकाने द्यावयाची एकूण रक्कम

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...