spot_img
अहमदनगरजामखेडमध्ये कडकडीत बंद! नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

जामखेडमध्ये कडकडीत बंद! नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

spot_img

जामखेड । नगर सह्याद्री
तालुयातील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे यांनी विद्यार्थी मुले व मुली यांच्यावर अत्याचार, अर्थिक, मानसिक छळवणूक केल्याचा आरोप होत आहे. याच्या निषेधार्थ व डॉ. भास्कर मोरे यांना अद्याप अटक करण्यात आली नाही यामुळे बुधवारी (दि.१३) जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

मेनरोड, खर्डा रोड, बीड रोड, तपनेश्वर रोड येथील सर्व दुकाने बंद असल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. जामखेड बंदची हाक उपोषणकर्ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले, रत्नदीप संस्थेचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी केले होते. त्यानुसार जामखेड शहर हे ग्रामस्थाकडून १०० टक्के बंद ठेवण्यात आले. रत्नदीप विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा बुधवारी नववा दिवस तर उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांच्या उपोषणाचा सातवा दिवस होता.

जामखेड तालुयातील रत्नापूर येथील रत्नदीप शैक्षणिक संकुलातील शेकडो विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याच्या विरोधात आठ दिवसापासून अंदोलन सुरु केले आहे. आज अंदोलनाचा नववा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या अंदोलनानंतर डॉ. भास्कर मोरे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचबरोबर हरीण पाळल्यामुळे वनविभागानेही गुन्हा दाखल केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लोणारे विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ नाशिक या विद्यापीठ समिती यांनी प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही तसेच परिक्षा फॉर्म भरून घेतले जातील यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक मार्फत अहवाल मागितला आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नाही. यामध्ये दुसर्‍या महाविद्यालयात समायोजन करणे, नोडल अधिकारी नियुक्त करणे, रत्नदीपची मान्यता रद्द करणे तसेच डॉ. मोरे वर गुन्हा दाखल होऊन सहा दिवस झाले पण पोलिसांकडून अद्याप अटक झाली नाही. त्यामुळे आंदोलन चालूच राहीले आहे. आंदोलक विद्यार्थी व शिवप्रतिष्ठाण हिदुस्थान तसेच ग्रामस्थांच्या वतीने रत्नदीप संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या उपोषणाला जाहीर पाठींबा देऊन जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...