spot_img
ब्रेकिंगनगर शहरात नेमकं चाललंय काय? दोन अल्पवयीन मुली घराच्या बाहेर गेल्या पण...

नगर शहरात नेमकं चाललंय काय? दोन अल्पवयीन मुली घराच्या बाहेर गेल्या पण परतल्याच नाही..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प व नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मुळ बिहार व सध्या मुकुंदनगर परिसरात राहत असलेल्या 50 वर्षीय महिलेने शनिवारी (16 नोव्हेंबर) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी 9 नोव्हेंबर रोजी सकाळी कामानिमित्त घराच्या बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची अल्पवयीन मुलगी (वय 17) घरी होती. तिला सकाळी साडेनऊ ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निसार शेख करत आहेत.

नगर तालुक्यातील एका गावात राहणार्‍या वृध्द व्यक्तीने शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने बुधवारी (13 नोव्हेंबर) सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान पळवून नेले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सातभाई करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिकेत कोणताही घोटाळा नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण, आमदार जगताप यांच्याबद्दल म्हणाले…

  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे स्पष्टीकरण अहिल्यानगर / नगर सह्याद्री - महानगरपालिकेत सुमारे ७७६...

महादेव मुंडे हत्या प्रकरण: न्याय मिळत नसल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

ज्ञानेश्वरी मुंडेने घेतले विष । बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल बीड | नगर सह्याद्री राज्यात संतोष देशमुख...

११ गावांसह २१ वाड्यांना मिळणार पाणी; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती

संगमनेर | नगर सह्याद्री अकोले तालुयातील पिंपळगाव खांड धरणातून संगमनेर तालुयातील पठार भागातील जवळे बाळेश्वरसह...

मविआच्या आमदारांचं टॉवेल-बनियनवर आंदोलन

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. बुधवारी विरोधकांनी सत्ताधार्‍यांविरोधात आक्रमक पवित्रा...