नवी दिल्ली / वृतसंस्था – लोकसभा निवडणुकीचा भाजपचा जाहीरनामा प्रसिध्द झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजप मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. तसेच, भाजपचे अनेक बडे नेतेही यावेळी उपस्थित होते.
राजनाथ सिंह यांनी जाहीरनाम्याचा प्रत्येक संकल्प हा मोदीच्या गॅरंटीसह युक्त आहे. भारतीय राजकारणात मोदींची गॅरंटी २४ कॅरेटसारखी शुद्ध मानली जाते, असं राजनाथ सिंह म्हणाले. भारतातच नाही तर जगभरातील राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यासाठी एक गोल्ड स्टँडर्ड आहे. मला विश्वास आहे की, जे संकल्प येथे मांडले ते २०४७ पर्यंत एका विकसित भारताच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पाला आकार आणि विस्तार होईल.
भाजपने आपल्या जाहीरनाम्यात तरुण, शेतकरी, महिला यांच्या कल्याणासाठी कार्यक्रम राबविण्याचं सांगितलं आहे. मच्छीमारांसाठी विमा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि धान्य सुपरफूड म्हणून विकसित करण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. एकलव्य शाळा सुरू करण्याचं आश्वासनही दिलं गेलं आहे. याशिवाय, एससी/एसटी आणि ओबीसींच्या कल्याणासाठी काम करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माँ कात्यायनीची पूजा करतो. माँ कात्यायनी आपल्या दोन्ही हातात कमळ घेऊन, हा संयोग मोठा आशीर्वाद. त्यासोबत सोन्याहून पिवळं म्हणजे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. अशा पवित्रवेळी भाजपने विकसित भारताच्या जाहीरनाम्याला देशासमेर ठेवलं. देशवासियांना शुभेच्छा. हा उत्तम जाहीरनामा तयार केल्याबाबत राजनाथ सिंह यांच्या टीमलाही शुभेच्छा.