spot_img
अहमदनगरनगर शहरात चाललंय काय? रेहान आणि फरहान यांचे भयंकर कृत्य!

नगर शहरात चाललंय काय? रेहान आणि फरहान यांचे भयंकर कृत्य!

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री:-
लग्न करण्यासाठी घरात घुसून अल्पवयीन मुलीला (वय १६) विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी (१ सप्टेंबर) दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास नगर शहरातील एका उपनगरात घडली. या प्रकरणी पीडिताने रात्री दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द विनयभंग, पोसो, मारहाण आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेहान दिलावर शेख, फरहान असिफ शेख (दोघे रा. पिंजार गल्ली, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नगर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, भिंगार कॅम्पचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. रविवारी दुपारी फिर्यादी अल्पवयीन मुलगी तिच्या घरी असताना रेहान शेख व फरहान शेख यांनी तिच्या घरात अनाधिकाराने प्रवेश केला. तु तुझ्या आई- वडिलांना माझ्या बरोबर लग्न लावून देण्यास सांग’ असे म्हणून तिला विवस्त्र केले.

लौंगिक छळवणुक करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. विनयभंग करून तिचा यापूर्वी देखील वेळोवेळी लौंगिक हेतून चोरून पाठलाग करून विनयभंग केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पीडिताने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक के. एस. साळुंखे करत आहेत.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरसेवकांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला! दोन दिग्गज नेते प्रवेश करणार

20-25 आजी-माजी नगरसेवक करणार शिंदे गटात प्रवेश | पदाधिकाऱ्यांचाही समावेश दोन दिग्गज नेते अन आजी-माजी...

शरद पवार-अजित पवार एकत्र!; बंद दाराआड चर्चा, चर्चांना उधाण…

पुणे / नगर सह्याद्री - शरद पवार आणि अजित दादा हा पवार कुटुंबियांसाठीच नाही...

ट्रॉफिकच्या हप्तेखोर बोरसेंना दोन दिवसात हाकला!; नगर शहरवासीयांच्या भावनांची आ. संग्राम जगताप यांच्याकडून दखल

‌‘नगर सह्याद्री‌’चा इम्पॅक्ट | आ. जगताप यांनी एसपींना दिला अल्टीमेटम। खातेनिहाय चौकशी करण्याची गृहमंत्र्यांकडे...

मंत्री विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान; म्हणाले हा सन्मान…

लोणी / नगर सह्याद्री आधुनिक कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या नावाने स्थापन झालेल्या...