spot_img
अहमदनगरधक्कादायक! चुलत्या-पुतण्यावर धारधार हत्याराने सपासप वार! 'ते' कारण आलं सामोरे..

धक्कादायक! चुलत्या-पुतण्यावर धारधार हत्याराने सपासप वार! ‘ते’ कारण आलं सामोरे..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री:-
चुलत्या-पुतण्यावर धारधार हत्याराने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यात घडली आहे. विशेष म्हणजे अंगणात दगड का फेकले असे विचारल्याचा राग येवून दाढी करायच्या वस्तऱ्याने वार केले आहे. याप्रकरणी अभिजित गोरक्ष काळे (वय ३०) व त्याचे चुलते भरत शेषराव काळे (दोघे रा. आगडगाव, ता.नगर) असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहे. तर अनिल भाऊसाहेब शिंदे (रा. आगडगाव, ता.नगर) याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: नगर तालुक्यातील आगडगाव येथे काळे आणि शिंदे कटूंब वास्तव्यास आहे. शुक्रवारी (दि.२०) सायंकाळी ७.३० च्या सुमारास अंगणात दगड का फेकले असे विचारल्याचा राग येवून अनिल शिंदे याने फिर्यादी अभिजित काळे याच्या घरासमोरील अंगणात दगड टाकले. ते का टाकले असे विचारले असता त्याचा राग येवून शिंदे याने अभिजित याची गचांडी पकडून त्याला हाताच्या चापटीने मारहाण केली.

नंतर त्याच्या हातातील वस्तऱ्याने उजव्या हातावर, मानेवर, पाठीवर वार करून जखमी केले. हा प्रकार सुरु असताना अभिजित याचे चुलते भरत काळे हे सोडवायला आले असता शिंदे याने त्यांच्या पोटावर, छातीवर व उजव्या खांद्यावर वार केले. तसेच परत जर माझ्या नादी लागले तर एकाएकाला जीवे ठार मारील अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...