spot_img
अहमदनगरनगरमध्ये चाललंय काय? 'एकाच रस्त्यावर कोट्यवधींचा खर्च'; भाजपाने वेधले आयुक्तांचे लक्ष

नगरमध्ये चाललंय काय? ‘एकाच रस्त्यावर कोट्यवधींचा खर्च’; भाजपाने वेधले आयुक्तांचे लक्ष

spot_img

अहमदनगर नगर सहयाद्री:-
सणासुदीचे दिवस जवळ येत असून शहरांमध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. डेंगूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. कचर्‍याचे ढीग ठिकठिकाणी दिसत असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घरोघरी घंटागाडी वेळेवर येत नाही, मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे, विस्कळीत पाणीपुरवठा, आदी विविध प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरांमध्ये खड्ड्याचे साम्राज्य असून ते सणासुदीच्या आधी बुजवावे तसेच शहरात सुरू असलेल्या रस्त्याबाबतच्या दर्जाकडे विशेष लक्ष देऊन दर्जेदार रस्ते निर्माण करावी. यापूर्वी एकाच रस्त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असून नागरिकांच्या पैशाचा दुरुपयोग होऊ नये, याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.

शहरातील विविध प्रश्न बाबत भाजप शिष्टमंडळाने आयुक्त यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी सभागृह नेते रवींद्र बारस्कर, विधानसभा अध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे, महिला अध्यक्ष प्रिया जानवे, गीता गिल्डा, माजी नगरसेवक रामदास आंधळे, नितीन शेलार, सचिन पारखे, राजेंद्र सातपुते, दत्ता गाडळकर, बाळासाहेब गायकवाड, बाबासाहेब सानप, बंटी ढापसे, गोपाळ वर्मा, मनोज ताठे, अरुण शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मनपा कर्मचार्‍यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आयुक्तांशी चर्चा झाली असून हा प्रश्न राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. तो सोडवण्यासाठी भाजप पाठपुरावा करेल. मनपा कर्मचारी हे शहरातील महत्त्वाचा घटक असून त्यांच्यामार्फत नागरिकांचे विविध प्रश्न मार्गी लागले जात असतात. तरी सातवा वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी दिली आहे.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...