Shirdi Crime : शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीवर डोके टेकविण्यासाठी येतात, त्याच शिर्डी शहरात सध्या चाललय काय सध्या असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी दोन खुणांच्या घटनांनी शिर्डी हादरली होती. यानंतर दिड महिन्यापूर्वी झालेल्या किरकोळ वादातून एका भाजी विक्रेत्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शिर्डीत पुन्हा घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.
सादिक शेख असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार आहेत. शिर्डीत दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच काल रात्रीच्या सुमारास आणखी एकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी शौकत शेख यांच्या मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ला झाल्याच्या घटनेने शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे.
सादीक शेख (वय ३६) हा तरुण प्राणघातक हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिड महिन्यापूर्वी सादिक शेख याचा काही जणांसोबत वाद झाला होता. याचा राग मनात धरून या किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे. पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहे.