spot_img
अहमदनगरनगमध्ये चाललंय काय? सारसनगर मध्ये झाडाला बांधून मारहाण तर नवनागापूरात अल्पवयीन मुलांची...

नगमध्ये चाललंय काय? सारसनगर मध्ये झाडाला बांधून मारहाण तर नवनागापूरात अल्पवयीन मुलांची काढली धिंड

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री-
नगरमध्ये नवनागापूर येथे अल्पवयीन मुलांची अर्धनग्न धिंड काढत बेदम मारहाण केल्याची घटना जाती असतानाच सारसनगर येथे एकाला झाडाला बांधून बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांना ताब्यात घेतले असून मारहाण करणाऱ्यांविरोधात कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

नगरमधील नवनागापूर परिसरात दोन अल्पवयीन तरूणांची अर्धनग्न धिंड काढत बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. असे असतांनाच सारसनगर औसरकर मळा येथे एकाला चोर समजून हात पाय बांधून, झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली आहे.

याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, मारहाण करुन त्या व्यक्तीस सोलापूर रोडवर टाकून देण्यात आल्याची माहिती आहे.

अल्पवयीन मुलांना मारहाण करुन काढली धिंड
अल्पवयीन मुलांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांची धिंड काढल्याची धक्कादायक घटना नवनागापूर परिसरात घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या जबाबावरुन १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दुसर्‍या फिर्यादीत चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धिंड काढल्याप्रकरणी पोलिसांनी तीघा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मारहाणीत जखमी झालेल्या दोन अल्पवयीन मुलांवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून एकावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

मारहाण करताना व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत राहत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या घरी काही तरूण सोमवारी दुपारी गेले होते. त्यांच्या नातेवाईकांना मारहाण करून अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांना अज्ञातस्थळी घेऊन जात लोखंडी रॉड, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करून धमकी दिली. मारहाणीत हातापायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. मारहाणीचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले.

मारहाणीत जखमी झालेल्या अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले असता तेथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या घटनेची दखल घेतली नाही. जखमींची फिर्याद नोंदवून घेतली नाही. त्यांना रूग्णालयात जाण्यास सांगितले. जखमी जिल्हा रूग्णालयात गेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान, मारहाण करणार्‍या राहुल मारूतीराव पाटील (वय २९ रा. शिवाजीनगर, नवनागापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी सायंकाळी ७:२१ वाजता चौघां अल्पवयीन मुलांविरूध्द मारहाण, शिवीगाळ, दमदाटीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मला मारण्याकरीता कोणी सुपारी दिली असे विचारले असता चौघांनी लांकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ दुसर्‍या दिवशी (मंगळवारी) सोशल मीडियावर व्हायरल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना याची माहिती मिळाली व अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली व घडलेला प्रकार सांगितल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या जबाबावरून १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. राहुल पाटील, प्रशांत वंजारे, करण काळे, प्रवीण गिते, विशाल काटे, विशाल कापरे, हर्षल गायकवाड, सोनु शेख, आर्यन शेवाळे, सागर दारकुंडे, सुरज शिंदे, रोहित (पूर्ण नाव नाही), पप्पु पगारे (सर्व रा. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...