अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीवर डोके टेकविण्यासाठी येतात, त्याच शिर्डी शहरात सध्या चाललय काय सध्या असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. महिन्याभरात दुहेरी हत्याकांड, गोळीबाराच्या घटना चर्चेत आल्या. आता रात्रीच्या सुमारास गावात शांतता असल्याचा फायदा घेत भामटे चोरी करून करत असल्याच्या घटना घडत आहेत.
प्रामुख्याने मंदिरांवर या चोरटयांनी लक्ष केंद्रित केले असून मंदिरातील दानपेटी व दागिने चोरी होत आहे. चोरट्यानी मंदिरातील दानपेटींवर देखील नजर ठेवण्यास सुरवात केली आहे. मध्यरात्रीच्या हनुमान मंदिरातील दानपेटी घेऊन चोरटे फरार झाले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या मंदिरात चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच शिर्डी जवळील निमगाव येथील हाउसिंग सोसायटीमध्ये चोरट्यांनी घरफोडी करत सोन्यासह अडीच लाखांचा ऐवज लंपास केल्याची देखील घटना घडली आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.