spot_img
अहमदनगरअहमदनगर मध्ये चाललंय काय! एका विद्यालयात घडली 'भयंकर' घटना; तोंड दाबून..

अहमदनगर मध्ये चाललंय काय! एका विद्यालयात घडली ‘भयंकर’ घटना; तोंड दाबून..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री ;-
सोमवारी (5 ऑगस्ट) सायंकाळी नगर तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीचे (वय 13) तोंड दाबून, हात-पाय बांधून तिचे अपनयन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) (अपनयन) व 127 (2) (अटकाव करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत मुलीने सांगितले की, ती विद्यालयात असताना सायंकाळी साडेचारच्या दरम्यान शौचालयाकडे जात होती. त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने तिचे तोंड दाबून तिला विद्यालयाच्या गच्चीवर नेले आणि तिला हात, पाय व तोंड बांधून तेथे अटकाव केले. सदरचा प्रकार विद्यालय सुटल्यानंतर साडेपाचच्या सुमारास लक्षात आला, त्यानंतर ग्रामस्थांनी विद्यालयात गर्दी केली आणि मुलीची सुटका केली.

एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली आणि सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मुलीला पोलीस ठाण्यात आणून तिच्या सांगण्यावरून फिर्याद नोंदवून घेण्यात आली.

सदरचा मुलगा कोण होता आणि त्याने मुलीसोबत का असे केले याबाबतची माहिती पोलीस घेत आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज मोढे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...