पुणे।नगर सहयाद्री
विद्येच्या माहेर घर असलेल्या पुण्यातपोलिसांनी मोठी कारवाई करत चार कोटी रूपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. यात तीन तस्करांना अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपुर्वी पुणे शहर परिसरात ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई केली होती. आता पुन्हा एकदा पुणे पोलिसांनी ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई करत त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल चार कोटी रूपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
यामुळे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले आहे. पोलिसांना त्यांच्या खबरीमार्फत या संदर्भात माहिती मिळाली होती. मोठ्या प्रमाणावर एमडी हा ड्रग पुण्यामध्ये येणार असल्याचे समजले होते. गुन्हे शाखेने त्यानुसार ही कारवाई केली आहे. पोलिसांनी जवळपास ४ कोटी रूपयांचे २ किलो एमडी जप्त केले आहे. ही मोठी कारवाई केल्यानंतर पोलिस सखोल तपास करत आहेत.
या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. याआधी ललित पाटीलकडून वेगवेगळे ड्रग्ज आणले जात होते. त्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतले. त्यानंतरही अशा प्रकारे ड्रग्ज आणले जात होते, त्यापैकी पोलिसांनी तीघांना अटक केली आहे.