spot_img
अहमदनगरतीन मुलांसोबत घडलं 'ते' भयंकर! पाच मित्रांनीच रचला होता डाव? वाचा सविस्तर..

तीन मुलांसोबत घडलं ‘ते’ भयंकर! पाच मित्रांनीच रचला होता डाव? वाचा सविस्तर..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री:-

जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त डीजे ठरवायला गेलेल्या मित्रांना पाच जणांनी गाठून मागील भांडणाच्या कारणावरून लोखंडी गजाने मारहाण करत चॉपरने वार करून जखमी केले. याप्रकरणी पाच जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आकाश जाधव, रा.आंबेडकर वसाहत, दत्तनगर याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ३१ जुलैला रात्री मी आणि माझा मित्र कार्तिक केदारी, संकेत कदम असे आम्ही दत्तनगर येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त डीजे ठरवायला गेलो होतो.

पायल डीजे यांच्या घरासमोर आम्ही तिघे उभे असताना तेथे रितेश, आकाश, अमित, साई, सयोग हे आले व मागीलभांडणाच्या रागातून शिवीगाळ, करू लागले. तेव्हा आपण मागील भांडण विसरलो असे त्यांना म्हणत असताना रितेश याने हातातील चॉपरने वार केला. तसेच साई याने लोखंडी रॉडने डोक्यात मारले तेव्हा खाली पडलो.

संकेत व कार्तिक हे मदतीला आले असता संकेत याच्या गालावर रितेश याने चॉपर मारला तसेच कार्तिक यास आकाश याने लोखंडी फायटरने डोक्यात मारले. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आकाश जाधव याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रितेश, आकाश, अमित, साई, सयोग यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं सावट! पुढील काही दिवस पावसाचे, IMD इशारा..

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं संकट आलं आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ आणि...

सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिल समोर, पोलीस अन् राजकीय दबावावर भाष्य

सातारा / नगर सह्याद्री - जिल्ह्यातील फलटण येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या...

ट्रस्ट जमीन प्रकरणी जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अशा आहेत मागण्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त...

क्षुल्लक कारणावरून महिलेवर चाकूहल्ला; नगरमध्ये धक्कादायक प्रकार

भावासह कुटुंबालाही मारहाण | बुरूडगाव येथील घटना अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुयातील बुरुडगाव येथे मला...