spot_img
ब्रेकिंगपवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यासोबत घडलं ते धक्कादायक! 'बीड' मधून अपहरण तर 'नगर' मधून...

पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यासोबत घडलं ते धक्कादायक! ‘बीड’ मधून अपहरण तर ‘नगर’ मधून झाली सुटका

spot_img

बीड। नगर सहयाद्री-
2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी चक्क वनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केज- मांजरसुंबा मार्गावरील टोलनाक्याजवळून अपहरण करत नगर जिल्ह्यात नेत अधिकाऱ्याला दोन कोटींची खंडणी मागीतल्याची घटना मंगळवारी घडली.

याप्रकरणी अवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केदू शिंदे (रा. टागोरनगर, नाशिक) यांच्या फिर्यादीवरुन रमेश घुले व त्याच्या १० ते १२ साथीदारां विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: मॅनेजर सुनील शिंदे २८ मे रोजी सहकाऱ्यासोबत केजकडे येत होते. मांजरसुंबा रस्त्यावरील टोलनाक्याजवळ जीप (एम एच १५ ईबी २६८२) चालकाने इशारा करून त्यांना थांबवले. जीपमधील रमेश घुले याने, पवनचक्कीच्या जागेसंदर्भात बोलायचे आहे असे म्हणत पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्य मदतीने त्यांना बळजबरीने जीपमध्ये बसवत त्यांचे अपहरण केले.

त्यानंतर खरवंडी (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथे त्यांना नेण्यात आले. पवनचक्कीचे काम करायचे असेल तर २ कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी अपहरणकर्त्यांनी केली. नगर जिल्ह्यातून सुटका झाल्यानंतर शिंदे यांनी मध्यरात्री १.२५ वाजता थेट केज पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...