spot_img
अहमदनगरनगरमध्ये घडलं ते 'भयंकर'! कारवाईच्या भिंतीने गावाचं झालं पसार; गावकऱ्यांनी तीन जणांसोबत...

नगरमध्ये घडलं ते ‘भयंकर’! कारवाईच्या भिंतीने गावाचं झालं पसार; गावकऱ्यांनी तीन जणांसोबत केल होत असं काही..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
चोर असल्याच्या संशयावरून तिघांना पांगरमल परिसरात ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. गावातील जमावाने केलेल्या मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. तर या मारहाणी एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान सदर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना समजल्यानंतर पोलिस तातडीने घटनस्थाळी दाखल झाले असून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. मात्र कारवाईच्या भितीने गाव रिकामे झाल्याची चर्चा सुरू आहे.

नगर तालुक्यातील पांगरमल येथे गेल्या काही दिवसांपासून शेतकर्‍यांची जनवारे चोरी होत असल्याचा प्रकार घडत होता. या संदर्भात ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देखील दिले होते. चोरीच्या घटनेमुळे गावकर्‍यांमध्ये मोठी चिड निर्माण झाली होती. त्यातच चोर असल्याच्या संशयावरून बुधवारी(दि.०३) रात्री गावात तिन इसम आल्याची चर्चा वार्‍यासरखी गावात पसरली.

गावात जमा झालेल्या जमावाने त्या तिघांना पकडत मारहाण केली. या मारहाणीत एकाचा दुर्देवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र कारवाईच्या भिंतीने गावातील लोक गायब झाल्याची चर्चा आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला असल्याची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...