spot_img
अहमदनगरकळमकरांच मित्रमंडळ नक्की कोणतं? सवता सुभा मांडल्याने नाराजी

कळमकरांच मित्रमंडळ नक्की कोणतं? सवता सुभा मांडल्याने नाराजी

spot_img

कळमकर काका -पुतण्यांकडून शिवसेना उबाठा गटासह काँग्रेसचे खच्चीकरण | सवता सुभा मांडल्याने नाराजी
सारिपाट । शिवाजी शिर्के
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेना उबाठा गटासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सोबत घेताना निकाल काहीही लागला तरी भविष्यात वाऱ्यावर सोडणार नाही आणि जगताप यांच्या विरोधात ही आघाडी कायम भक्कम राहिल अशी ग्वाही देणाऱ्या कळमकरांनी त्यांच्या निवडणुकीतील पराभवानंतरच्या नेहमीच्या पॅटर्ननुसार भूमिका बदललीच! अभिषेक कळमकर यांनी दोन दिवसांपूव आभाराची घेतलेली बैठक ही त्यांची व्यक्तीगत परिवाराची होती की महाविकास आघाडीची असा थेट सवाल आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

कळमकर काका- पुतण्यांकडून शिवसेनेसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीचे देखील खच्चीकरण करण्याची सुपारीच घेतली असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कळमकर यांनी मांडलेला हा सवता सुभा येत्या महापालिका निवडणुकीत महागात पडणार हे आता स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणूक पार पडली. महाविकास आघाडीच राज्यभर पाणीपात झालं. अहिल्यानगर जिल्हात देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व काँग्रेसचा प्रत्येकी एकच आमदार निवडून आला. अहिल्यानगर शहर मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मविआचे अधिकृत उमेदवार अभिषेक कळमकर यांचा थोड्या थिडक्या नव्हे तर तब्बल चाळीस हजार मतांनी महायुतीचे हॅट्रिक करणारे आ. संग्राम जगताप यांनी दारुण पराभव करत इतिहास रचला.

जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या जवळपास सर्वच पराभूत उमेदवारांनी आभार मेळावे घेतले. राज्यात आणि जिल्हाभरातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सहकारी घटक पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांना निमंत्रीत करत मेळावे झाले. मात्र नगर शहरात दादाभाऊ कळमकर आणि त्यांचा पराभूत पुतण्या उमेदवार अभिषेक कळमकर यांना शिवसेना उबाठा व काँग्रेस पक्षाचा सोयीस्कररित्या विसर पडल्याचे पाहायला मिळाले. यातून दोन्ही सहकारी पक्षांच खच्चीकरण कळमकर काका – पुतणे करत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. त्यातही कळमकर यांचे मित्रमंडळ म्हणजे नक्की कोणते असा थेट सवालही यानिमित्ताने सोशल मिडियात उपस्थित केला जात आहे.

कळमकर यांनी स्नेह संवाद कार्यक्रम नगर शहरात आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमासाठी शिवसेना उबाठा व काँग्रेसचे नेते व्यासापीठावर दिसले नाही. दोन्ही घटक पक्षांना या मेळाव्याचे निमंत्रणच नसल्याची चर्चा शहरात आहे. निवडणूक प्रचारा वेळी दररोज दोन्ही घटक पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांना निरोप धाडणाऱ्या कळमकर यांना दारूण झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या सहकारी पक्षांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानावे वाटले नाहीत. हा चर्चेचा विषय झाला आहे. त्यातच अन्य मतदारसंघांमध्ये मेळावे पराभवा नंतर लगेच घेतले गेले. मात्र कळमकर यांना कार्यक्रम घेण्याचे उशिराने शहाणपण सुचल्याचे दिसले. त्यातही त्यांनी गरज सरो वैद्य मरो अशी भूमिका घेतली. त्यामुळे भविष्यात आधीच कमकुवत झालेली शहर मविआ आणखी कमजोर होण्याची चिन्हे दिसत आहेत.

गटबाजीला खतपाणी घालणाऱ्या अभिषेकमुळे मनपा निवडणूक मविआसाठी अडचणीचीच!
शहराची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेली. कळमकर घराण्यात मागील काळात चार वेळा सलग पराभव होऊन देखील पाचव्यांदा उमेदवारी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी दिली. पराभवाचा कित्ता दादाभाऊ कळमकर यांच्या घराणेशाहीचे पुढील पिढीतील वारसदार अभिषेक कळमकर यांनी देखील गिरवला. मात्र या निवडणुकीत अभिषेक कळमकर यांनी शिवसेना उबाठा व काँग्रेस पक्षांतर्गत गटबाजीला खतपाणी मिळेल अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यामुळे निवडणूक निकालानंतर शिवसेना ऊबाठा गटातील जवळपास सर्वच नगरसेवक युवा सेनेचे सचिव विक्रम राठोड यांना सोडून शिंदे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस अंतर्गत गटबाजी कळमकर यांनी निर्माण केल्याचा देखील आरोप कार्यकर्ते करीत आहेत. यामुळे संग्राम जगताप यांच्या नेतृत्वा खालील भक्कम असणाऱ्या महायुतीच्या विरोधात कळमकर यांच्या झालेल्या दारुण पराभवामुळे महाविकास आघाडीचा निभाव लागणे कठीणच असेल.

विजय लोकांच्या डोळ्यात पाहणाऱ्यांना आमचा विसर कसा काय?
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अभिषेक कळमकर यांनी स्वत:च एकट्याने पुढाकार घेतला आणि त्यास अभिषेक कळमकर मित्रमंडळ असे नाव दिले. याच मंडळाच्या नावाखाली त्यांनी स्नेहमेळावा आयोजित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना निमंत्रीत केले. वास्तविक पाहता कळमकर यांची उमेदवारी ही महाविकास आघाडीची होती. मेळावा आयोजित करताना त्यांनी काँग्रेससह शिवसेनेच्या कोणत्याही स्थानिक नेता, पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतले नाही आणि आमंत्रण देखील दिले नाही. त्यांना मिळालेली अंशी हजार मते ही त्यांची एकट्याची अथवा राष्ट्रवादीची नाहीत आणि नव्हती!

जात-धर्माच्या विषाची पेरणी कळमकरांचीच!
महापौर पदाच्या कार्यकाळात काम केल्याची पावती मिळाल्याचे कळमकर यांनी या मेळाव्यात सांगितले असले तरी त्याची खिल्ली आता शिवसेना उबाठासह काँग्रेसकडूनच उडवली जात आहे. मुळात हे पदच त्यांना संग्राम जगताप यांच्या मेहेरबानीने मिळाले होते. जगताप यांचा रिमोट कंट्रोल होता आणि त्यातूनच कामे झाली असताना कळमकर हे त्यांचे महापौरपद मतांची आघाडी घेण्यात कामी आल्याचा दावा करत असतील तर मग आम्ही काय करत होतो असा सवाल आता महाविकास आघाडीतील नगरसेवक करत आहेत. जात- धर्माच्या विषाची पेरणी कोणी केली आणि मुस्लिमांचे लांगुलचालण पहाटेपर्र्यंत कोण करत होते हे नगरकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले असल्याचा टोला जगताप समर्थक सोशलमिडियाच्या माध्यमातून करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दगाफटका केल्यास सरकारचा कार्यक्रमच लावणार; जरांगे पाटील काय म्हणाले पहा…

बीड / नगर सह्याद्री - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच...

शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषाने ५० लाखांची ऑनलाईन फसवणूक

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून...

नगरमध्ये पुन्हा ताबेमारी, कुठे घडला प्रकार पहा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील व्यापार्‍यांच्या नगर तालुक्यातील शेत जमिनींवर ताबा मारण्याचे प्रकार समोर...

महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन; आमदार संग्राम जगताप यांची माहिती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा कुस्तीगीर...