spot_img
मनोरंजन2024 या वर्षाने मला काय काय दिलं? प्राजक्ताने खरं खरं सांगितलं

2024 या वर्षाने मला काय काय दिलं? प्राजक्ताने खरं खरं सांगितलं

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. प्राजक्ताने नाटकाने सुरू केलेला हा तिचा प्रवास अत्यंत खडतर असल्याचं सांगितलं आहे. नवीन वर्षात प्राजक्ताने पदार्पण करताना २०२४ या वर्षाचे आभार मानले आहेत. प्राजक्ता एक अभिनेत्री, नृत्यागंणा, व्यवसायिका आणि निवेदीका सर्वगुणसंपन्न अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

२०२४ या वर्षाने मला काय दिलं?
प्राजक्ताने नवीन वर्षानिमित्त सकाळ प्रिमियरला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत प्राजक्ताला २०२४ वर्षाला काय सांगशील? प्राजक्ताने २०२४ वर्षाचे धन्यवाद मानले आहेत. या वर्षात मला खूप काही शिकायला मिळाले. फिल्म प्रोसेसिग मला फार जवळून पाहायला मिळाली. प्रमोशनल, मार्केटींग शिकायला मिळाली. हास्यजत्रेच्या कामासोबतच चित्रपटाचे काम सुरू होते. माझे दोन चित्रपट नवीन वर्षात तुमच्या भेटीला येतील.

प्राजक्ताने याचवर्षी निर्मितीक्षेत्रात पदार्पण केले. प्राजक्ताचा फुलवंती हा चित्रपट रिलीज झाला. प्रमोशनच्या काळात प्राजक्ताने प्रचंड मेहनत केली आहे. या कष्टायची फळे चांगली मिळाल्याने मी आनंदी आहे.

प्राजक्ता माळी ही सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे. प्राजक्ता अभिनयासोबतच नृत्यांगणा, निवेदिका आणि व्यवसायिका या क्षेत्रात देखील तितकीच सक्रिय असलेली पाहायला मिळते. लहानपणापासूनच प्राजक्ताला नृत्याची आवड होती. भरतनाट्यम् प्राजक्ताने केलं आहे. याचनिमित्ताने प्राजक्ताने फुलवंती या चित्रपटात तिचं स्वप्न पूर्ण केलं. प्राजक्ताने फुलवंती या चित्रपटात पारंपारिक साज श्रृगांर केला होता जो तिच्या प्राजक्तराज या दागिन्यांचा कलेक्शनमधील आहे. कर्जत येथे प्राजक्ताचा प्राजक्तकुंज हा फॉर्महाऊस आहे. जेथे पर्यटक भेट देतात. निसर्गाच्या सानिध्यात प्राजक्ताचं फार्महाऊस आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम मामा लंके यांचे निधन

निघोज / नगर सह्याद्री : कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष...

‘लाडकी बहीण’वरून लाडक्या बहिणी भिडल्या; कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत...

लाच स्वीकारताना तलाठी अडकला जाळ्यात; नगरमध्ये कुठे घडला प्रकार पहा…

कोपरगाव | नगर सह्याद्री सदनिकेच्या खरेदीखताची नोंद सातबारा उतार्‍यावर करून देण्यासाठी साडेसहा हजार रुपयांची लाच...

चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ व्हायरल करणे भोवले; काय घडलं पहा

चार इंस्टाग्रामधारकांवर गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे (चाईल्ड पोर्नोग्राफी) व्हिडीओ सोशल...