Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीही एप्रिलच्या हपत्त्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. एप्रिल महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. परंतु एप्रिल महिना संपायला ६ दिवस उरले आहेत. त्यामुळे हा हप्ता लांबण्याची शक्यता आहे. जर एप्रिलचा हप्ता मे महिन्यात दिला तर एकत्र ३००० रुपये देणार की २ टप्प्यांमध्ये १५०० रुपये देणार असाही एक प्रश्न उपस्थित होत आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. आता महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे महिलांच्या पगाराची तपासणी केली जात आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. दरम्यान, ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. ज्या महिला पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.