spot_img
अहमदनगरनातेवाईकांसोबत गेला पण क्षणात दिसेनासा झाला! १७ वर्षांच्या युवकासोबत हंगा नदीवर काय...

नातेवाईकांसोबत गेला पण क्षणात दिसेनासा झाला! १७ वर्षांच्या युवकासोबत हंगा नदीवर काय घडलं?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
बेलवंडी येथील गावठाणलगतच्या पोलीस दूरक्षेत्राच्या जवळ असणाऱ्या हंगा नदीच्या पात्रात बुडून साई संतोष पवार (वय १७) या युवकाचा मृत्यू झाला. यावेळी गावकऱ्यांसह रायगव्हाणच्या पथकाने सात तासांच्या प्रयत्नानंतर बुडालेल्या तरुणाचा नदीतून मृतदेह काढला बाहेर काढला.

बेलवंडी गावातील हंगा नदीच्या पात्रात पवार हा आई व इतर नातेवाईकांसमवेत कपडे धुण्यासाठी गेला होता. नदीच्या पात्रात असणारी गणपती बाप्पाची मूर्ती काढण्यासाठी तो पात्रात उतरला. पण पाण्याचा अंदाज न घेता तो गणपती बाप्पाच्या मूर्तीपर्यंत जाऊ लागला. यावेळी पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. यावेळी सोबत असणारा त्याचा मोठा भाऊ यश पवार व इतर नातेवाईक यांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. तसेच शेजारचे तरुण मदतीला धावले. पण काही क्षणात साई दिसेनासा झाला.

अनेक तासांच्या प्रयत्नांनंतरही पवार याचा शोध लागला नाही. अखेर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, उत्तम डाके, डॉ. अशोक शेलार व ग्रामस्थांनी रायगव्हान येथील अनिल पठारे यांच्याशी संपर्क साधला. पठारे व त्यांचे सहकारी काळू निकम, सोन्या साळुंखे, राहुल साळुंखे, राजेंद्र बर्डे, विजय बर्डे, मंगेश जाधव, संतोष जाधव, गणेश सूर्यवंशी, राजू गायकवाड यांनी शोध मोहीम राबवली.

यावेळी मुसळधार पाऊस आणि वीज नसल्याने मोहिमेत अडचण आली. अखेर सात तासांच्या प्रयत्नानंतर पवार याचा मृतदेह सापडला. साई पवार हा युवक मुळचा साकूर-मांडवे येथील पण शिक्षणासाठी तो चुलते विकास पवार यांच्याकडे नुकताच बेलवंडी येथे आला होता. तो गावातील छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता ११ वीत शिकत होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम अहिल्यानगर...