अहमदनगर | नगर सहयाद्री:-
शहरात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या घटनेते सातत्याने वाढ होत आहे. शाळेला जाते असे सांगून गेलीली अल्पवयीन मुलगी पुन्हा परतली नसल्याने पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्यादी दिली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
रेल्वे स्टेशन रस्ता परिसरात राहणार्या रिक्षा चालकाने गुरूवारी (26 सप्टेंबर) कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची अल्पवयीन मुलगी (वय 15) गुरूवारी सकाळी 11 वाजता शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली.
दरम्यान दुपारी एक पर्यंत ती शाळेतून घरी आली नसल्याने फिर्यादी यांनी तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला परंतू ती मिळून आली नाही. त्यांनी रात्री 11 वाजता कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे. पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.