spot_img
अहमदनगरस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकविणार; जिल्हाप्रमुख अनिल शिंदे काय-काय म्हणाले?

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकविणार; जिल्हाप्रमुख अनिल शिंदे काय-काय म्हणाले?

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
समाजात हिंदुत्वाचे विचार घेऊन कार्य करणाऱ्या शिवसैनिकांना एकत्र आणले. जुने, नवीन सहकाऱ्यांना एकत्रित करुन पक्षाची मोट बांधण्यात आली आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला सक्षमपणे सामोरे जावून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यात येणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी व्यक्त केला.

नगर शहर व तालुक्यातील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) प्रमुख नेते व पदाधिकारी यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शहरात परतले असताना त्यांचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी स्वागत करुन सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शहर प्रमुख सचिन जाधव, दिलीप सातपुते, संभाजी कदम, माजी नगरसेवक गणेश कवडे, संजय शेंडगे, आप्पा नळकांडे, दत्ता जाधव, दत्ता कावरे, बाळासाहेब बोराटे, संदेश कार्ले, शरद झोडगे, डॉ. दिलीप पवार, गुलाब शिंदे, रामदास भोर, अशोक दहिफळे, सुरेश क्षिरसागर, संजय आव्हाड, सुनील लालबोंद्रे, अनिल लोखंडे, सचिन शिंदे, आशिष शिंदे, ओंकार शिंदे, संतोष ग्यानप्पा, संग्राम कोतकर, योगेश गलांडे, प्रल्हाद जोशी, अभिजीत अष्टेकर, सुरेश तिवारी, दामोदर भालसिंग, रवींद्र लालबोंद्रे, प्रशांत गायकवाड, घनश्याम घोलप, बबलू शिंदे, अक्षय भिंगारे, भरत कांडेकर, अभि कोतकर, घनश्याम घोलप आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे शिंदे म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने ज्वलंत हिंदुत्वाचा वारसा घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे जात आहे. त्याच विचारेने सर्व शिवसैनिक त्यांच्या मागे एकवटले आहेत. शहरासह नगर तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवण्याचे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेबरोबर; संदेश कार्ले
पूवपासूनच हातात धनुष्य घेऊन शिवसेनेच्या विचाराने काम सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजकारणाचा वसा घेऊन वाटचाल करीत आहे. सर्वसामान्य जनतेचे काम होण्यासाठी सत्तेबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या जलजीवन मिशन, साकळाई या महत्त्वपूर्ण योजना शिवसेनेच्या माध्यमातून पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून काम करून जनतेला न्याय दिला जाणार आहे. जनतेच्या हितासाठी सत्तेचा उपयोग केला जाणार असून, अधिक वेगाने काम करण्याची संधी पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याची भावना त्यांनी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी व्यक्त केली.

शहरासह जिल्ह्यात शिवसेनेचा झंझावात; सचिन जाधव
शिवसेनेचा झंजावात शहरासह तालुक्यात आणि जिल्ह्यात निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी कल्याणकारी योजना राबवून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. याच भूमिकेतून त्यांच्या मागे शिवसैनिकांसह जनता देखील एकवटली जात असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश कवडे यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सहकाऱ्यांचे स्वागत करून एकजुटीने वाटचाल केली जाणार असल्याचे शहर प्रमुख सचिन जाधव स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नारा महायुतीचा, तयारी स्वबळाची!; विखे-जगताप एक्सप्रेस सुसाट, कोतकरांची महापालिकेला एण्ट्री

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्वतंत्र बैठका,  महाविकास आघाडीत शांतताच शांतता सुनिल चोभे | नगर सह्याद्री:- आगामी होऊ...

माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन; चित्रा वाघ यांच्या आरोपांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे....

ग्रामदैवत विशाल गणेश मंदिरात सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते बुधवारी ‌‘श्रीं‌’ची प्राणप्रतिष्ठा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त...

बाप्पाच्या आगमनापूर्वी पावसाचा जोर वाढला; 12 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट

मुंबई | नगर सह्याद्री गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार...