नवी दिल्ली-
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. रविवार, 9 जून 2024 रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीची तारीखही ठरली असून 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली.
नरेंद्र मोदी सलग तिसऱ्या वेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. रविवारी ९ जून रोजी सायंकाळी सहा वाजता मोदींचा शपथविधी सोहळा दिल्लीत पार पडणार आहे. आज संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक झाली. यावेळी राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला अमित शाह, एचडी कुमारस्वामी, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू यांनी अनुमोदन दिलं आहे.
भाजप-शिवसेना युती फेव्हिकॉलचा जोड
संसदेतील गटनेते म्हणून पंतप्रधान मोदी यांना आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने समर्थन देतो. भाजप-शिवसेना युती हा फेव्हिकॉलचा जोड है तुटेंगा नहीं, गेल्या १० वर्षात पंतप्रधान मोदीजीनी देशाचा विकास केला असून अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. त्यामुळे आज संपूर्ण जगात भारताचं नाव आघाडीवर आहे
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्वागत है भाई स्वागत है! पंतप्रधान मोदींचं आगमन होताच घोषणाबाजी
आज जुन्या संसद भवनात एनडीएमधील घटकपक्षांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला सर्व खासदार उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांचं संसदेत आगमन होताच खासदारांनी टाळ्यांचा कडकडाटासह त्यांचं स्वागत केलं. तसेच स्वागत है भाई स्वागत है अशा जोरदार घोषणा देखील दिल्या. खासदारांचं आपल्यावरील प्रेम पाहून नरेंद्र मोदी चांगलेच भारावून गेले होते.