आंबा खाण्यापूर्वी पाण्यात ठेवणं का महत्त्वाचं? आहेत जबरदस्त फायदे
आंबा प्रत्येकाला आवडतो. वर्षातून एकदा अंबा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे आंब्याला मागणी देखील फार मोठी असते.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आंबा प्रचंड आवडतो.
पण काही जण आंबा खाण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेतात.
अनेक जण आंबा खाण्यापूर्वी पाण्यात ठेवतात, पण का? जाणून घ्या आयुर्वेद तज्ज्ञाकडून फायदे...
आयुर्वेद एक्सपर्ट यांनी दिलेल्या माहिती नुसार, पिकलेल्या आंबा खाण्यापूर्वी आंब्याला 1 ते 2 तास पाण्याला भिजत ठेवा.
एक्सपर्टने सांगितल्यानुसार, आंबा पाण्यात भिजवल्याने त्यातील अतिरिक्त फायटिक ॲसिड निघून जाते.
हे एक प्रकारचे विरोधी पोषक आहे. जे शरीराला काही खनिजे जसे की लोह, जस्त, कॅल्शियम आणि इतर खनिजे शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करते.
ज्यामुळे खनिजांची कमतरता होऊ शकते.
भिजवलेल्या आंबा खाल्ल्यामुळे त्वचेच्या समस्या, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आणि इतर आतड्यांसंबंधी समस्या टाळण्यास मदत होते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा
'या' फुलांना मार्केटमध्ये असते वर्षभर मागणी,मिळेल पैसाच पैसा