spot_img
महाराष्ट्रआम्ही 'तो' संघर्ष करणार; धक्कादायक निकालानंतर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

आम्ही ‘तो’ संघर्ष करणार; धक्कादायक निकालानंतर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
निकाल तर धक्कादायक आहेच, पण यामध्ये अनेक शंका जनसामान्यांच्या मनात येतात हे नाकारता येत नाही, राज्यघटना वाचवायची असेल तर संघर्ष करावा लागेल, आम्ही तो संघर्ष करणार असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना संगमनेर मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा 10560 मतांनी पराभव केला. पराभवनंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधत पराभवावर भाष्य केलं आहे.

थोरात म्हणाले, धर्माचा उपयोग, पैशाचा उपयोग, काही योजना , केवळ राजकारणासाठी वापरण्यासाठी घेतल्या , हे सुद्धा कारण आहे, याच्यातून त्यांना या जागा मिळालेल्या आहेत. खर म्हणजे यश नाही, त्यांनी ओढूण ताणून यश मिळवलेलं आहे. क्लृप्त्या करुन यश मिळवलेलं आहे. खर म्हणजे ना कुणाला रोजगार दिला, महागाई कमी केली, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्या भ्रष्टाचाराची चौकशी केली, ना स्त्रियांवरील अत्याचाराच्या प्रकरणात लोकांना उत्तरं दिली, याच्यात कसं यश मिळतं याबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आहेत असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ज्या साधनांचा वापर भाजप करत आहे, तो लोकशाहीला मोठा धोका आहे. कोणता दर्जा लोकशाहीचा आणि निवडणुकीचा असणार याची काळजी आहे. पुढच्या काळात लोकशाही कुठं जाईल याची काळजी वाटणारी निवडणूक आहे. लाडकी बहीण योजना राजकीय कारणासाठी होती. सातशे कोटी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी पकडल्या जातात, काय काय नाही त्याचा वापर केला. धर्माचा वापर केला, माणसांमध्ये भेद निर्माण केला. महायुतीच्या लोकांनी चार काम चांगली आणखी चांगली करु याची चर्चा झाली नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

संगमनेरमध्ये जे काही झालं, त्याची कारणं काय होती याचा शोध घेतला जाईल, या जनतेनं 40 वर्ष स्वीकारलं, कुठं काय घडलं हे पाहावं लागेल.जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात एवढं मोठं बहुमत त्यांना मिळतं आहे त्याची कारणमीमांसा केली जाईल,कशाचा परिणाम आहे, ज्या संसाधनांचा वापर प्रचंड प्रमाणात केला जातो. धर्माचा वापर केला जातो, जातीचा वापर केला जातो, भाजपची ही खरी साधनं आहेत.देशातील लोकशाही वाचवायची असेल, राज्य घटना वाचवायची असेल तर संघर्ष करावा लागेल. आम्ही तो संघर्ष करु, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभा निकालानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Manoj Jarange Patil News : अरे आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला...

तुमचे व्हॉट्सॲप कुठे कुठे आहे चालू? या युक्तीने कळेल क्षणार्धात

नगर सहयाद्री वेब टीम :- WhatsApp हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे, जे प्रत्येकजण...

महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजणार; लवकरच मोठा निर्णय होणार?

Politics News: राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला धूर चारत पुन्हा...

राज्याला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार; रोहित पाटलांचा दणदणीत विजय

Politics News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती...