spot_img
महाराष्ट्रआम्ही एकाही मराठा आंदोलकाला उपाशी ठेवणार नाही, मुंबईतील डबेवाल्यांचा निर्धार

आम्ही एकाही मराठा आंदोलकाला उपाशी ठेवणार नाही, मुंबईतील डबेवाल्यांचा निर्धार

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : मनोज जरांगे पाटील २६ जानेवारीला मुंबईत उपोषणाची येतील. लाखो मराठा आंदोलक त्याठिकाणी असतील. या सर्व आंदोलकांना मराठा समाज बांधवांच्यावतीने रसद पुरवली जाणार आहे.

मुंबई मध्ये या आंदोलनादरम्यान कस लागणार आहे. शहरातील सेवा सुविधांवर ताण तर येणारच आहे, मग अशा परिस्थितीत आंदोलनकर्त्यांना पर्यंत जेवण पुरवणे हे एक आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी“ डबेवाला रोटी बॅन्क”सरसावली आहे. ज्या मराठा समाज बांधवांना आंदोलनकर्त्यांना जेवण द्यायचे असेल व त्यांच्याकडे वाहतुकीची काही सोय नसेल तर त्यांनी डबेवाला रोटी बॅन्कच्या 8424996803 या हेल्प लाईन नंबर वर संपर्क साधावा.

डबेवाला रोटी बॅन्कची गाडी आपल्याकडे येईल आणि ते अन्न घेऊन आंदोलनकर्त्यांपर्यंत पोहोचवले जाईल. वाहतुकीची समस्या लक्षात घेता ही सुविधा फक्त दक्षिण मुंबई पुरती मर्यादित राहील. मुंबईतील डबेवाला कामगार हा मराठा आहे. आपले काम ही ईश्वर पूजा आहे, असे मानून तो मुंबईत काम करतो. आर्थिकदृष्ट्या तो गरीब आहे. पण मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत आला आहे. त्याला आपला पण मदतीचा काही हातभार, खारीचा वाटा का होईना,

पण त्यात असला पाहीजे असे त्याला वाटते, अशी भावना डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी बोलून दाखवली. डबेवाला रोटी बँकेच्या गाड्या २४ तास अन्न पुरवण्याची सेवा देणार आहे. उद्देश एकच आहे की मुंबईत कोणीही मराठा समाज बांधव उपाशी राहू नये, असे सुभाष तळेकर यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर स्वच्छ होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही: आ. संग्राम जगताप

शहराच्या डीप लीन स्वच्छतेसाठी घेतली आक्रमक भूमिका अहिल्यानगर | नगर सह्याद्री आ.संग्राम जगताप यांनी शहराच्या स्वच्छतेसाठी...

छापेमारीत उघडकीस आले देहविक्रीचे अड्डे; बॉडी मसाज पार्लरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय!

Maharashtra Crime News: मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे....

पारनेर नगरपंचायत क्षेत्रात विकासाची नवी पहाट; ‘या’ कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

पारनेर । नगर सहयाद्री पारनेर नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नगरविकास विभागाच्या योजनेअंतर्गत...

स्विफ्ट कारने पाठलाग करून तरुणाचा जीव घेणारा जेरबंद

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादाचा राग मनात धरून स्विफ्ट कारने पाठलाग...