spot_img
ब्रेकिंगआम्ही जे बोलतो ते करतो, 'मी' मराठा समाजाला आरक्षण देणार; एकनाथ शिंदे...

आम्ही जे बोलतो ते करतो, ‘मी’ मराठा समाजाला आरक्षण देणार; एकनाथ शिंदे याचं महत्वाचं विधान

spot_img

Eknath Shinde Maratha Aarakshan : आम्ही जे बोलते ते करतो. मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबईमध्ये आज महायुतीमध्ये संयुक्त पत्रकार परिषद झाली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुतीच्या कामाचे रिपोर्ट कार्ड जारी केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबत महत्वाचं विधान केले.

अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच महायुतीने एकत्रितपणे संयुक्त पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीसह विरोधकांवर सडकून टीका केली. पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला स्पष्ट शब्दांत उत्तर देताना मनोज जरांगे यांना एक सल्ला दिला आहे.

मराठवाड्यात कधी कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते. आम्ही न्या. शिंदे कमिटी स्थापन केली. इतकी वर्षे ज्यांच्याकडे संधी होती, हातात सत्ता होती, त्यांनी कधी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. फक्त मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले. पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की, महायुतीने काय काय दिले, सारथी दिले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ दिले. ओबीसी समाजाप्रमाणे मराठ्यांना सवलती देण्यात आल्या. हे सगळे कोणी केले? मराठा समाजाला कोणी वंचित ठेवले आणि कोणी दिले, याचा विचार मनोज जरांगे यांनी करायला हवा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही जे बोलतो ते करतो. मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार, तेही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता. मी दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करुन मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली. त्यानंतर तात्काळ विधानसभा अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते, ते आरक्षण कोणी घालवले, ते त्यांना कोर्टात टिकवता आले नाही. आता आम्ही आरक्षण दिले आहे, ते रद्द करण्यासाठी आटापिटा सुरु आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना उद्देशून केली.

एकनाथ शिंदे धाडसी माणूस
मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात, तर फक्त एकनाथ शिंदेंच देऊ शकतात. तो धाडसी माणूस आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे बोलत नाही, बोलला तर पूर्ण करतो. एकनाथ शिंदे कुणालाही अंगावर घेणार, पण आरक्षण देणार. आजही मराठा समाजात एकनाथ शिंदेंच्या शब्दाला किंमत आहे. तुम्हाला कोण काम करु देत नाही, हे माहित नाही. पण या लफड्यात माझ्या मराठ्यांचा वाटोळं झालं, असे जरांगे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...