spot_img
अहमदनगर‘आम्ही संगमनेरी, विठुरायाचे वारकरी’; युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची 'दिंडीत सेवा'

‘आम्ही संगमनेरी, विठुरायाचे वारकरी’; युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ‘दिंडीत सेवा’

spot_img

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पायी दिंडीत सेवा । डॉ जयश्रीताई थोरात यांचा सक्रिय सहभाग
संगमनेर । नगर सहयाद्री:-
वारकरी संप्रदायाच्या विचारांप्रती निष्ठा राखत डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील ५०० युवक व युवतींनी यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात सक्रिय सहभाग घेत आरोग्य, स्वच्छता आणि अन्नसेवा आदी माध्यमातून वारकऱ्यांची सेवा केली.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, आम्ही संगमनेरी, विठुरायाचे वारकरी” या ब्रीदवाक्याखाली युवक काँग्रेसच्या या विशेष दिंडीने संगमनेर-अहिल्यानगर मार्गे टेंभुर्णी येथे दाखल होत संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे दर्शन घेतले.या प्रवासात वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, अन्नवाढ, स्वच्छता मोहीम, संवाद सत्रे आयोजित करण्यात आली.

सुमारे ७० किलोमीटरच्या या प्रवासात डॉ. जयश्रीताई थोरात यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत स्वयंपाक, प्रसाद वाटप, मुक्काम व्यवस्थापन या सर्व उपक्रमांमध्ये थेट सहभाग घेतला.विविध गावांमध्ये कीर्तन व प्रवचन सत्रात सहभाग, तसेच महिलांशी वैयक्तिक संवाद हा उपक्रमही पार पडला.

सोलापूर जिल्ह्यातील करकम येथीलरिंगणामध्ये ही सहभाग घेत वारकरी रिंगणाचा आनंद लुटला. या रिंगणामध्ये माऊली माऊलीच्या गजरात डॉ जयश्रीताई थोरात  डोक्यावर तुळशी घेऊन सहभागी झाल्या. या रिंगणासाठी सुमारे दोन ते अडीच लाख वारकरी उपस्थित होते.

थोरात कुटूंबाची वारकरी संप्रदायाची विचारधारा!
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वारकरी संप्रदायाची विचारधारा कायम जपली आहे. मानवता हा खरा धर्म असलेल्या या संप्रदायात कोणताही जातिभेद किंवा उच्च-नीचतेचा भाव नाही. सर्वजण ‘माऊली’ म्हणून एकमेकांशी आदराने वागतात, पाया पडतात आणि हीच परंपरा महाराष्ट्राचे वैभव आहे.
– डॉ. जयश्रीताई थोरात

थोरात कुटुंबीयांची वारकरी परंपरेशी नाळ: खा लंके
थोरात परिवाराला समाजकार्याची व वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम सर्वांना सोबत घेऊन समाज विकासाचे काम केले आहे .आणि हीच शिकवण वारकरी संप्रदायाने दिली आहे. गोरगरिबांची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा असून डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात तरुणांनी वारीमध्ये सहभाग घेऊन सेवा दिली हा कौतुकास्पद उपक्रम असल्याचे खा लंके म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...