spot_img
अहमदनगरआम्हाला देवी प्रसन्न होते, 'त्यांना' होत नसेल तर त्यात आमचा दोष कायॽ...

आम्हाला देवी प्रसन्न होते, ‘त्यांना’ होत नसेल तर त्यात आमचा दोष कायॽ मंत्री विखे पाटील यांनी कुणावर साधला निशाणा?, वाचा..

spot_img

कर्जत | नगर सहयाद्री:-
तालुक्यातील होलेवाडी चिलवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शंभुराजे देसाई यांनी पाहाणी केली .या भागातून जाणार्या कुकडी कालव्याच्या रूंदीकरणाचे आणि मजबुती करणाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी कुकडी प्रकल्पाच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले.

कर्जत तालुक्यात होलेवाडी चिलवडी आणि नवलेवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची पाहाणी करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेवून संवाद साधला.प्रामुख्याने कुकडी कालव्याच्या आवतीभोवती झालेले अतिक्रमण आणि भराव खचल्याने कालव्यातून मोठ्या प्रमाणात आलेले पाणी शेजारच्या वाड्या वस्त्यांपर्यत आले. यामुळे नागरीकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. ही बाब ग्रामस्थांनी मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिली.

मंत्री विखे पाटील यांनी कुकडी कालव्याच्या अधिक्षक अभियंता श्रीमती अहीरराव यांना तातडीने या कामाचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले. यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासित करून त्यांनी सांगितले की अन्य काही काम ही जलसंधारण विभागाशी संबंधित असल्याने यासंदर्भात विभागाचे अभियंता गायमुखे यांनी गांभीर्याने निर्धारीत वेळेत याबाबत प्रस्ताव तयार करावेत त्यालाही मान्यता लगेच देत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

कमी लोकसंख्येची वस्ती असली तरी अनेक वर्ष पुलाची मागणी पूर्ण झाली नाही या तक्रारीचे गांभीर्य घेवून पुलाच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि कार्यकारी अभियंता यांनी समन्वयाने काम सुरू कराण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत .अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून हे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आशा सूचना जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत.मदतीपासून कोणीही वंचित राहाणार नाही याची दक्षता घ्यावी.रा ज्यासह जिल्ह्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाचे गांभीर्य राज्य सरकारने घेतले असून सर्व मंत्री जनतेत जावून परीस्थिती जाणून घेत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

संजय राऊत रोज बोलले नाही तर, संपादक म्हणून त्यांची ओळख राहाणार नाही. त्यांच्या बोलण्याला आम्ही महत्व देत नाही असे सांगून मंत्री विखे पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना माहूरची देवी आमची कुलदेवता आहे. अनेक वर्ष पहील्या माळेला मी तिथे जातो. आम्हाला देवी प्रसन्न होते. सदावर्तेना होत नसेल तर त्यात माझा काय दोषॽ

मंत्री शंभूराज देसाई यांनी शेतकर्याचे दुख जाणून घेण्यासाठी सर्व मंत्री वेगवेगळ्या भागात गेले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कोण काय टिका करतो याला आम्ही महत्व देत नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना रेडकार्पेट पाहाणी दौरे कोणी केले त्याचे पुढे काय झाले आणि त्या सरकारच्या काळात काय घडले यावर आम्हाला बोलता येईल मात्र आजच्या परीस्थितीत राजकारण आम्हाला करायचे नाही. आशा शब्दात मंत्री देसाई यांनी आ.रोहीत पवार यांच्या समाज माध्यमावरील टिकेला उतर दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आदिवासी मोर्चाला हिंसक वळण; आंदोलनात दगडफेक,वाहनांची तोडफोड

नंदूरबार / नगर सह्याद्री - नंदूरबारमधील आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलनात दगडफेक झाल्यानंतर...

शिर्डी साई संस्थान समितीच्या नियुक्तीला स्थगिती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिर्डी साई संस्थान समितीप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला असून...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारनेर दौऱ्याला विरोध; भूमिपुत्र संघटना व पारनेर कारखाना बचाव समिती आक्रमक

पारनेर | नगर सह्याद्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दि. 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्याचे...

पारनेर तालुक्यात ‘आर्थिक’ सुनामीची लाट; ‘या’ पतसंस्थेत 81 कोटींचा अपहार

पारनेर | नगर सह्याद्री कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील राजे शिवाजी सहकारी पतसंस्थेत तब्बल 81...