spot_img
ब्रेकिंगआम्हीही राज ठाकरेंचे फॅन, त्यांनी..! आमदार रोहित पवार नेमके म्हणाले काय? पहा..

आम्हीही राज ठाकरेंचे फॅन, त्यांनी..! आमदार रोहित पवार नेमके म्हणाले काय? पहा..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
मी देखील राज ठाकरे यांच्या भाषणांचा फॅन आहे. त्यांनी मविआ सोबत यावं ही आपली इच्छा आहे. भाजपसोबत जाण्याआधी त्यांनी विचार करावा. भाजपसोबत असलेल्या दोन पक्षांचा त्यांना फायदा दिसत नाही, म्हणून छोट्या पक्षांना सोबत घेत आहेत. महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्या महायुतीमध्ये आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश होण्याची चिन्हे आहेत. सध्या दिल्लीमध्ये भाजपच्या कोअर समितीची बैठक सुरू असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत प्रदेश पातळीवर अनेक बडे नेते राजधानीमध्ये पोचले आहेत. राज ठाकरेही काल सायंकाळी विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर आ. रोहित पवार यांनी वरील वक्तव्य केलं आहे.

आ. पवार म्हणाले, महाराष्ट्रातील जनता भाजपसोबत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे भाजप लहान-लहान पक्षांना सोबत घेऊन मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन पक्ष फोडूनही या दोन्ही पक्षांचा काही उपयोग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे ज्या पक्षांना पाच वर्षांपूर्वी महत्व दिले जात नव्हते, त्यांची आठवण आता भाजपला झाली आहे. उत्तर आणि दक्षिण भारतात एक राज्य आहे, ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो.

जी संतांची भूमी आहे. चांगल्या व्यक्तिमत्वाच्या विचारांनी प्रेरित आहेत. इथे जनता आपल्यासोबत नाही, अशी भाजपची भावना आहे. त्यामुळे भाजपला आता सर्व लहान-मोठ्या पक्षांना सोबत घेऊन मतांचे विभाजन करायचे आहे. सर्व पक्षांना एकत्र करणे शय असेल तर ते करू. २०१९ मध्ये ज्या पक्षांना महत्त्व दिले गेले नाही अशा सर्वच पक्षांना महत्त्व दिले जात असल्याचे आ. रोहित पवार म्हणाले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...