14 गावांकडून टँकरची मागणी | बिडीओंकडुन पाणी टंचाईची पाहणी
सुपा | नगर सह्याद्री:-
पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा करणा-या विहिरी, कुपनलिका यांनी तळ गाठला असून गावोगाव पाणीटंचाईच्या झळा बसु लागल्या आहेत. याबाबत पंचायत समितीकडे या गावांमधील ग्रामपंचायत प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करीता मागणी अर्ज दाखल केले आहेत.
तालुक्यातील पठार भागावर दरवष प्रमाणे मार्च महिन्यातच पाणी टंचाई सुरु होते. पठार भागावरील कान्हुर पठार, पिंपरी पठार,पिंपळगाव रोठा, पुणेवाडी, वेसदरे, विरोली, कारेगाव यासंह रांजणगाव मशिद, सारोळा आडवाई, करंदी, पळसपुर, मुंगशी, पळशी, म्हसोबाझाप या 14 गावांचे टँकर द्वारे पाणी मागणी अर्ज दाखल झाले आहेत. त्यानुसार गटविकास अधिकारी दयानंद पवार या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन टंचाईची पाहणी करत आहेत त्यानुसार या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. दिवसेंदिवस पाणी पातळी कमी होत असल्याने गावातील पाणीपुरवठा करणारे जे उद्भव असतात ते अटतात.
कान्हुर पठार सह सोळा गाव योजनेचे देखील नविन निधीतील काम सुरु आहे. ही योजनाही सद्यस्थितीत बंद अवस्थेत आहे. पाणी उपलब्ध होत नसल्याने या गावांतील नळाद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात येत आहे. या गावांना टँकर द्वारेच पाणी घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. 2022 मध्ये 17 गावांना 7, 2023 मध्ये 35 गावांना 30, 2024 मध्ये 49 गावांना 38 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. यंदाही अनेक गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या असल्याने टँकरची मागणी होवू लागली आहे.
अहवालानंतर तात्काळ मंजुरी
तालुक्यातील ज्या गावांचे टँकर द्वारे पाणी पुरवठा मागणी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या गावांमधील पाणीपुरवठा करणारे उद्भवांची पाहणी करणार आहोत. तहसिल व पंचायत समिती विभागाचा संयुक्त अहवालानंतर तात्काळ प्रस्तावास मंजुरी देण्यात येईल.
– गायत्री सौंदाणे, तहसीलदार पारनेर.
14 गावांचे अर्ज
तालुक्यातील 14 गावांचे टँकरद्वारे पाणी मागणी अर्ज पंचायत समितीकडे प्राप्त झाले आहेत. त्यानुसार या गावांची टंचाईची पाहणी करत आहोत. त्यानुसार प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहेत.
– दयानंद पवार, गटविकास अधिकारी.