spot_img
अहमदनगरWater Supply Stop: नगर शहरात पाणीबाणी! 'या' कारणाने पाणीपुरवठा राहणार बंद

Water Supply Stop: नगर शहरात पाणीबाणी! ‘या’ कारणाने पाणीपुरवठा राहणार बंद

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
शहराला पाणी पुरवठा करणार्‍या मुळा डॅम येथील प्रकल्पाचा वीज पुरवठा महावितरणच्या विद्युत कामासाठी शनिवारी सकाळी ११ ते ५ या वेळेत बंद राहणार आहे. त्यामुळे नगर शहरासह उपनगराचा पाणी पुरवठा शनिवार (२५ मे) पासून एक दिवस उशिराने होणार आहे.

शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी, गुलमोहर रस्ता, पाईपलाईन रस्ता, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, सारसनगर, बुरुडगाव रस्ता, केडगाव, नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. या भागात रविवारी पाणी पुरवठा होईल. रविवारी मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, डाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगालचौकी, माळीवाडा, कोठी, गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी, सिव्हिल हाडको, प्रेमदान हाडको, टीव्हीसेंटर परिसर, म्यूनिसीपल हाडको, स्टेशन रस्ता, आगरकर मळा, विनायकनगर या भागात पाणी पुरवठा होणार नाही. येथे सोमवारी (२७ मे) पाणीपुरवठा होईल. सोमवारी सिद्धार्थ नगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रस्ता, आनंदी बाजार, कापड बाजार, खिस्तगल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रस्ता, सावेडी या भागात पाणीपुरवठा होणार नाही. या भागात मंगळवारी (२८ मे) पाणीपुरवठा होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कुकडीचे आवर्तन तातडीने सोडा; कोणी केली मागणी पहा…

माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के यांचे उपोषण सुरू श्रीगोंदा | नगर सह्याद्री कुकडीच्या सल्लागार समितीची...

कर्जत नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, आता काय घडलं पहा

उच्च न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस , गटनेता बदलण्याचा प्रस्ताव पुन्हा कोर्टात कर्जत | नगर सह्याद्री कर्जत...

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर संक्रात; इतक्या ठिकाणी रेड, पहा सविस्तर

विविध ३३ गुन्ह्यांत पाच लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्हा पोलीस अधीक्षक...

संगमनेरचे राजकीय वातावरण बिघडले; थोरातांचा मंत्री विखेंवर निशाणा, काय म्हणाले पहा

संगमनेर | नगर सह्याद्री तालुक्यात सध्या राजकीय वातावरणात घडत असलेल्या बदलांमुळे एक प्रकारची दहशतीची भावना...