अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जलजीवनचे काम ठेकेदार नेमणूकीपर्यत आघाडी सरकारच्या काळात झाली आहेत. येथे काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांचे आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांच्याशी लागेबंधे आहेत. आता सरकार बदलल्यामुळे आरोपाच्या गोष्टी होत आहेत. अशा शब्दात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी जोरदार निशाणा साधला.
अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन योजनांच्या कामाची चौकशी करण्याची करण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केली होती. त्यानुसार जिल्ह्यामध्ये केंद्रीय पथकाने कामाची चौकशी देखील केली. मात्र यावर बोलतांना भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
जलजीवनचे सर्व कामे ठेकेदारांच्या नेमणूकीपर्यत हे आघाडी सरकारच्या काळात झालेले आहे. कर्जत जामखेडमध्ये सर्व ठेकेदार हे रोहित पवारांचे लागेबंधे असलेले आहेत. तर पारनेरमध्ये देखील माजी आमदार यांचे ठेकेदार आहेत. मात्र आता सरकार बदलल्यामुळे त्यांचे नुकसान झाल्याने या सर्व गोष्टी उभारल्या जातं आहेत. खरंतर वर्क ऑडर निघाल्यानंतर सरकार बदलल्याने यांनी बसविलेल्या लोकांकडून काम करवून घेण्याची नामुष्की आमच्यावर आल्याची टीका सुजय विखे यांनी केली आहे.