spot_img
आरोग्यदूधात पाणी की पाण्यात दूध? भेसळ ओळखण्यासाठी वापरा 'ही' सिंपल ट्रीक, एकदा...

दूधात पाणी की पाण्यात दूध? भेसळ ओळखण्यासाठी वापरा ‘ही’ सिंपल ट्रीक, एकदा पहाच

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम:- दूध आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे. दूधाचे सेवन केल्याने विविध आजारांवर मात करता येते. दूधात कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, व्हिटॅमीन ए आणि डी सुद्धा असतं. त्यामुळे दूध प्यायल्यावर आपल्या शरीरात ही सर्व पोषक द्रव्य जातात. त्यामुळे दररोज एक ग्लास तरी दूधाचे सेवन केले पाहिजे.

पूर्वी घरोघरी गाई आणि म्हशी असायच्या. त्यामुळे सर्वांना शुद्ध आणि ताजं दूध पिण्यासाठी मिळत होतं. मात्र आता शहरांमध्ये गाई किंवा म्हशी नाहीत. त्यामुळे येथील नागरिक विविध कंपन्यांमधील पिशवीत मिळणारं दूध खरेदी करतात.

परंतु दूध अशी गोष्ट आहे ज्यात कितीही पाणी मिक्स केले तरी त्याचा रंग काही बदलत नाही. त्यामुळे आपल्याला कुणीही सहज फसवू शकतं. आता अशा फसवणुकीपासून स्वत: चा बचाव करण्यासाठी एक ट्रीक समोर आली आहे.

भेसळ ओळखण्याची सिंपल ट्रीक
पाणी मिक्स असलेलं दूध ओळखण्यासाठी एक काचेचा तुकडा घ्या. त्यावर दूधाचे ५ थेंब एकाचवेळी टाका. हे दूध सावकाश आणि हळूहळू खाली सरकले तर समजा यात पाण्याची भेसळ नाही. मात्र दूध खाली पटकन गेले तर समजून जा की या दूधामध्ये जास्तप्रमाणात पाणी टाकण्यात आले आहे. घरच्याघरी या सिंपल ट्रीकने तुम्ही पाणी असलेलं दूध ओळखू शकता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गुरुवार ‘या’ राशींच्या लोकांसाठी भरभराटीचा, तुमची रास काय? पहा

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा...

जी. एस. महानगर बँक निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार, मोठी माहिती समोर..

पारनेर | नगर सह्याद्री जी एस महानगर बँकेची निवडणूक लवकरच होणार असून यासाठी मतदारांची नवीन...

मनपाचे 1680 कोटींचे बजेट मंजूर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेचा सन 2024-2025 चा सुधारीत व सन 2025-2026 चा मूळ...

स्मशानभूमी परिसरात थाटला ‘ऑक्सिजन पार्क‌‌‌’; नगर जिल्ह्यातील ‘या’ गावाची चर्चा!

वृक्षप्रेमी रसाळ बंधु यांचे कार्य कौतुकास्पद: आमदार काशिनाथ दाते पारनेर । नगर सहयाद्री:- निसर्गाच्या सान्निध्यात वृक्ष...