spot_img
ब्रेकिंगसावधान! पुढील 48 तासात ‘या’ भागात कोसळणार गारा?

सावधान! पुढील 48 तासात ‘या’ भागात कोसळणार गारा?

spot_img

Weather Update: एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात प्रचंड उष्णतेचा कहर जाणवत आहे. काही भागांमध्ये तापमान 42 अंशांच्या वर गेलं आहे. अशातच येत्या 13 आणि 14 एप्रिल रोजी राज्यात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येणार असून त्याचा फटका विदर्भ आणि मराठवाडा विभागांना बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुण्यातील काही भागांत पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या पावसामुळे कमाल तापमानात 3-5 अंशांची घट होणार असून दिवसा ढगाळ हवामानामुळे उकाडा काहीसा वाढण्याची शक्यता आहे.

नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने गारपिटीचा विशेष अलर्ट जारी केला आहे. या भागांत वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट होऊ शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13-14 एप्रिल रोजी हलक्या पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव परिसरात देखील पावसाचे ढग निर्माण होण्याची शक्यता असून हवामानात घसरण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यभरात उष्णतेचा तडाखा जाणवत असतानाच हवामानात होणारा अचानक बदल आणि गारपिटीचा धोका ही शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बाब आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...