अहमदनगर । नगर सहयाद्री-
वारकऱ्यांची पाऊले विठुरायाच्या ओढीनं पंढरीच्या दिशेनं चालू लागणार आहे. संत निवृत्तिनाथ पायी दिंडी सोहळ्यात त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीच्या वाटेवरील गावोगावचे लोक सहभागी होत असतात. आषाढी वारीसाठी श्री संत निवृत्ती नाथांचा सोहळा परंपरेने त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे गुरुवार, दि. 20 जून रोजी टाळ-मृदंगाच्या गजरात प्रस्थान करणार आहे.
पंढरपूर यात्रा देवशयनी एकादशी आषाढ शु. 11 अर्थात 17 जुलै 2024 रोजी असणार आहे. त्यामुळे अनेक वारकऱ्याना पंढरीच्या विठूरायाच्या भेटीची ओढ लागली आहे. निवृत्तीनाथ दिंडी सोहळ्यात ५० ते ६० हजार भाविक वारकरी दरवर्षी सहभागी होत असतात. निवृत्तीनाथांच्या पालखीतलं पहिलं गोल रिंगण सिन्नर जवळील दातली येथे पार पडते. यावेळी हजारो वारकरी हरिनामाच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या तालात फेर गोल रिंगण धरत विठुरायाच्या जयजयकार करत असतात.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटलांच्या प्रशासनाला सूचना
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी आणि दिंडी सोहळा नगर जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी या तालुक्यातून मार्गस्थ होत असतो. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून 20 जून रोजी मार्गस्थ होणार आहे. 27 जून रोजी परंपरेप्रमाणे तालुक्यातील पारेगाव येथे या पालखीचा मुक्काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर या पालखी मार्गाच्या सुरू असलेल्या कामाची माहिती मंत्री विखे पाटील यांनी जाणून घेतली. तसेच या मार्गाच्या कामाबाबत प्रांताधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहे.
दिंड्यांतील वारकऱ्यांची काळजी घ्या
पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला नगर जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील अनेक दिंडया जिल्ह्यातून जातात. या दिंड्यामधील वारकऱ्याऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. दिंड्यांच्या मुक्कामाची ठिकाणे ठरलेली आहेत. ज्या गावात अथवा शहरामध्ये या दिंड्या मुक्कामी थांबणार आहेत त्या ठिकाणी बारकऱ्यांची मुकामाची व्यवस्था करण्यात यावी. वारकऱ्यांना दिंडी मार्गावर शुध्द पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था, आरोग्य चांगले राहील.
– जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ
दिंड्यासोबत पोलीस बंदोबस्त
वारकरी पायी चालत असलेल्या मार्गावर वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी दिंड्यांसोबत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. तसेच दिंड्या ज्या ठिकाणी मुक्कामी राहतील तेथेही पोलीस कर्मचारी उपस्थित राहतील यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यातील दिंड्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गाची आवश्यकतेनुसार डागडुजी. खड्ढे भरण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सुचनाही संबंधित विभागाला दिल्या.