Maharashtra Politics: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरु होणार आहे.
दरम्यान, राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी २७ मार्चला मतदान होणार आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात होणार आहे.
विधान परिषदेतील आमश्या पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कनाड हे सदस्य विधानसभेवर निवडून गेल्याने त्या जागा रिक्त झाल्या आहेत त्यासाठी निवडणूक होणार आहे.