पारनेर । नगर सहयाद्री
विधानसभा निवडणुकीत कामोठे स्थित पारनेरकरांनी बजावलेली भूमिका श्रीकृष्णाच्या संघटित शक्तीची जाणीव करून देणारी ठरली. पारनेर तालुक्यातील मतदारांनी विधानसभेला एकदिलाने थर लावल्यानेच खऱ्या अर्थाने लोकशाहीची हंडी फोडली असल्याचे प्रतिपादन आमदार काशिनाथ दाते यांनी केले.
मुंबईच्या कामोठे शहरात पारनेर तालुका रहिवासी संघ (मुंबई स्थित) व पठार भागातील रहिवाशांच्या सहकार्याने आयोजित केलेला दहीहंडी महोत्सव जल्लोषात साजरा झाला. या भव्य सोहळ्याला आमदार काशिनाथ दाते यांची विशेष उपस्थित लाभली. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करत कामोठे स्थित पारनेरकरांनी राजकारण बाजूला ठेवून पुढील वर्षी एकच दहीहंडी करावी अशी अपेक्षा आ. दाते यांनी व्यक्त केली.
मुंबई, पुणे, ठाणे, मिरा-भाईंदर, कोकण अशा विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर गोविंदा पथके या महोत्सवासाठी दाखल झाली होती. मुसळधार पावसातही हजारो भाविकांनी उपस्थित राहून गोविंदा आला रे आला च्या गजरात वातावरण दणाणून टाकले. सोहळ्याची सुरुवात दहीहंडी पूजनाने व भक्तिगीत कार्यक्रमाने झाली. महिलांसाठी खास सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आले. दुपारी झालेल्या थर लावण्याच्या स्पर्धेत जय श्रीराम गोविंदा पथक (कळंबोली) यांनी सात थर लावून प्रथम क्रमांक पटकावला. शिवप्रेरणा गोविंदा पथक (कळंबोली) यांनी द्वितीय, तर आई-बाबा गोविंदा पथक (कामोठे) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
या सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, जी.एस. महानगर बँकेच्या अध्यक्षा श्रीमती गितांजलीताई उदयराव शेळके, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ दादा कोरडे, समाजभूषण अॅड. पांडुरंग गायकवाड साहेब, संदीप वराळ पाटील फाउंडेशन अध्यक्ष सचिनभाऊ वराळ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पारनेर तालुका अध्यक्ष भास्करराव उचळे, उद्योजक पंढरीनाथ उंडे, भाजप शहराध्यक्ष विकासदादा घरत, तसेच हॅप्पी सिंग, राजकुमार पाटील, प्रदीप भगत, दिलिप पाटील, सुनिल शर्मा, अमोल शेठ सैद, दामोदर चव्हाण, अरुण जाधव साहेब, अॅड. समाधान काशिद, डॉ. संतोष जाधव, डॉ. श्रीकांत तोडकर (उपमुख्यमंत्री ओ.एस.डी., मंत्रालय), आणि शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्त्या सुवर्णाताई वाळुंज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी पारनेर तालुका रहिवासी संघाचे अध्यक्ष भाऊशेठ पावडे, कार्याध्यक्ष कुंडलिकशेठ वाफारे, उपाध्यक्ष दिलिपभाऊ घुले, सचिव कृष्णाशेठ ढोमे, खजिनदार सबाजी जराड, तसेच कार्यकारिणी सदस्य शिवाजीभाऊ सुपेकर, जनार्दन उंडे, गणेश गुंड, शुभम वाफारे, मनोज कवडे, उद्धव लांडगे, महादेवशेठ पुंडे, धनंजयशेठ निमसे, तुषार लांडगे, शेखर काशिद, संजय आहेर, महेश कवडे आदींनी अतिशय काटेकोर नियोजन करून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कोरठण गडाचे विश्वस्त जालिंदर खोसे यांनी केले.