spot_img
ब्रेकिंगVoter ID जवळ नाही, टेन्शन सोडा, तरीही मतदान करता येणार, ही १२...

Voter ID जवळ नाही, टेन्शन सोडा, तरीही मतदान करता येणार, ही १२ कागदपत्रेही आहेत ग्राह्य

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
दि. १७ – मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळख जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल. मतदान केंद्रामध्ये मोबाईल बाळगण्यास मनाई असल्याने कोणीही मतदान केंद्रामध्ये माबाईल बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

येत्या २० नोव्हेंबर, २०२४ रोजी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाचेवेळी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू न शकणाऱ्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

यामध्ये आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), निवृत्ती वेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत

. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. या १२ ओळखपत्रांपैकी कोणत्याही एका ओळखपत्राची मूळ प्रत मतदानावेळी जवळ बाळगावीत, असे आवाहनही सालीमठ यांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विरोधकांना हलक्यात घेणे लंकेंना महागात पडले! बुक्का अन् वाजंत्री गँगने दाखवला हिसका

पारनेरकरांनी थोपविलं लंके यांचे प्रस्थापित होणं | सुजय विखेंचे सुदर्शन चक्र चालले | बुक्का...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना‌’ यशस्वी अन्‌‍ आरक्षणाच्या फुग्याला टाचणी; महायुती 200 पार अन्‌‍ मविआचा..

फडणवीसांची जादू; ‌‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना‌’ यशस्वी अन्‌‍ आरक्षणाच्या फुग्याला टाचणी अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- फुले,...

अहिल्यानगरमध्ये महायुतीच! महाविकास आघाडीचं पानिपत

महाविकास आघाडीचं पानिपत | हेमंत ओगलेंनी वाचवली इज्जत | शरद पवारांसह ठाकरेसेनेला झिडकारले विजयी: भाजप...

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीच; संगमनेर शहरातून निघणार विजयाची मिरवणूक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगरच्या १२ मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास...