spot_img
ब्रेकिंगविष्णू चाटेने दिली धक्कादायक कबुली; वाल्मीक अण्णाचा पाय खोलात

विष्णू चाटेने दिली धक्कादायक कबुली; वाल्मीक अण्णाचा पाय खोलात

spot_img

बीड / नगर सह्याद्री –
२ कोटींच्या खंडणी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणामध्ये वाल्मीक कराडच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटेची चौकशीत मोठी कबुली दिली आहे. वाल्मीक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते, अशी कबुली विष्णू चाटेने सीआयडीला दिली आहे. सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा केला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मीक कराडच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. २ कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीच्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे सध्या पोलिस कोठडीत आहे. विष्णू चाटेची सीआयडीने कसून चौकशी केली. त्याने वाल्मीक कराडबाबत धक्कादायक माहिती दिली त्यामुळे या प्रकरणात वाल्मीक कराड आणखी गोत्यात येणार आहे. वाल्मीक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते, अशी कबुली चाटेने दिली आहे.

सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात असा खुलासा करण्यात आला आहे की, विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने धमकी दिल्याची तक्रार पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. कराडने पवचक्की कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असल्याचे चाटे याने आता कबूल केले आहे. त्यामुळे वाल्मीक कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाल्मीक कराडला ‘अॅप्निया’ नावाचा आजार ; न्यायालयाकडे केली ‘ही’ मागणी
खंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेला वाल्मीक कराड याला अॅप्निया नावाचा आजार आहे. या आजाराचे कारण पुढे करत कराडने न्यायालयाकडे आपल्याला २४ एक मदतनीस मिळावा, अशी मागणी केली आहे. वाल्मीक कराडची मंगळवारी रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली होती. त्यावेळी कराडला श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार त्याने पोलिसांकडे केली. मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कारडने आपल्याला स्लीप अॅप्निया नावाचा आजार असल्याचा दावा केला आहे. या आजारामुळे कराडला श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे ऑक्सीजनसारखे मशीन त्याला दररोज लावले जाते. हेच मशिन चालवण्यासाठी सीआयडी कोठडीत आपल्याला 24 तास मदतनीस देण्याची विनंती कराडने न्यायालयाकडे केली. त्याच्या विनंतीनंतर केज जिल्हा व सत्र न्यायालयाने सीआयडीला शासकीय वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे सुचवले असल्याचे सांगण्यात येत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोप वाल्मीक कराडवर आहे. तर खंडणीच्या एका गुन्ह्यात कराडला अटक करण्यात आली आहे. तो पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण गेला. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला केज कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार धस यांचे मंत्री मुंडेंवर गंभीर आरोप; मंत्री विखे पाटील म्हणाले, पुरावे असतील तर..

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - Radhakrishna Vikhe Patil : मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत आमदार सुरेश...

संतोष देशमुख प्रकरणात शरद पवारांनी उचलले मोठे पाऊल, केले असे…

मुंबई / नगर सह्याद्री - बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राजकीय वातावरणात एकच...

शेवटच्या टोकापर्यंत पाणी कसे मिळेल यासाठी नियोजन करा, मंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी व घोड कालवा सल्लागार समितीची बैठक...

आमदार शिवाजी कर्डिले यांचा नगर पंचायत समितीवर डोळा; पहा पडद्याआड काय घडतंय…

नगर तालुका महाविकास आघाडीतील नाराजी भाजपाच्या पथ्यावर | ...तर भाजपा स्वबळावर सुनील चोभे | नगर...